संगमनेर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली; दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 02:50 PM2020-02-14T14:50:09+5:302020-02-14T14:51:02+5:30

निळवंडे धरणातून संगमनेर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अकोले तालुक्यात फुटल्याने शहरातील पाणी पुरवठा शुक्रवारपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.  दरम्यान, पाईपलाईन दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. पाईपलाईन दुरूस्तीचे काम पूर्ण होइपर्यंत पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी दिली. 

A water supply pipeline breaks down in Sangamner city; Repair work started on the battlefield | संगमनेर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली; दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू

संगमनेर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली; दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू

संगमनेर : निळवंडे धरणातूनसंगमनेर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अकोले तालुक्यात फुटल्याने शहरातील पाणी पुरवठा शुक्रवारपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. 
दरम्यान, पाईपलाईन दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. पाईपलाईन दुरूस्तीचे काम पूर्ण होइपर्यंत पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी दिली. 
निळवंडे धरणातून संगमनेर शहराला नियमित पाणी पुरवठा केला जातो. मात्र, गुरूवारी रात्री अकोलेजवळील कोकणेवाडी येथे पाईपलाईन फुटल्याने शहराला होणारा पाणी पुरवठा शुक्रवारपासून बंद करण्यात आला आहे. पाईपलाईन दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू  असून सदरचे काम पुर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरू होईल. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन नगराध्यक्षा तांबे, उपनगराध्यक्ष वसीम शेख, पाणी पुरवठा सभापती राजेंद्र वाकचौरे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदींनी केले आहे. 

Web Title: A water supply pipeline breaks down in Sangamner city; Repair work started on the battlefield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.