सुपा एमआयडीसीतील पाणीपुरवठा आठवड्यापासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 02:36 PM2020-09-11T14:36:50+5:302020-09-11T14:37:33+5:30

पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा गेल्या आठवडाभरापासून बंद झाल्याने कारखान्यांना जादा पैसे देऊन पाणी घ्यावे लागत आहे. त्याचा परिणाम उत्पादन व निर्मितीवर होत आहे.

Water supply in Supa MIDC closed from week | सुपा एमआयडीसीतील पाणीपुरवठा आठवड्यापासून बंद

सुपा एमआयडीसीतील पाणीपुरवठा आठवड्यापासून बंद

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा गेल्या आठवडाभरापासून बंद झाल्याने कारखान्यांना जादा पैसे देऊन पाणी घ्यावे लागत आहे. त्याचा परिणाम उत्पादन व निर्मितीवर होत आहे. हा पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी सुपा कारखानदार संघटनेचे अध्यक्ष अनुराग धूत यांनी केली आहे.
याबाबत एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता एन. जी. राठोड म्हणाले, पाणी पुरवठ्यासाठी वापरात असणारी जलवाहिनी निंबळक (ता. नगर) जवळ फुटल्याने हा ब्रेक डाउन असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करून शनिवारी संध्याकाळ पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुपा एमआयडीसीसाठी मुळा जलाशयातून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. खूप दूरवरून येणारी ही योजना आहे. त्यामुळे सुपा एमआयडीसीसाठी अजून एक पर्यायी पाणीपुरवठा योजना येथून जवळच असणाऱ्या विसापूर जलाशयातून राबवावी, अशी मागणी उद्योजक सुनील थोरात, वाघुंडे गावचे सरपंच संदीप मगर, उद्योजक प्रमोद पठारे यांनी केली आहे. एमआयडीसीतील पाणी बंद झाल्याने आम्हाला दररोज ९० हजार लिटर पाणी टँकरचे घ्यावे लागते. त्याचा परिणाम प्रॉडक्ट क्वाॅस्ट व क्वाॅलिटी वर होत असल्याचे के. एस. पी. जी. कंपनीचे व्यवस्थापक शिवाजी झनझने यांनी सांगितले . टँकरने जादा पैसे देऊन विकतचे पाणी घेऊन कारखान्यातील उत्पादन घेणे अवघड व कठीण काम असल्याचे मिंडा कारखान्याचे व्यवस्थापक उल्हास नेवाळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तातडीने पर्यायी व्यवस्था होणे गरजेचे असल्याचे गणराज इस्पात उद्योगाचे संचालक गौरवशेठ दुगड व अकार्ड ऑर्गनिक्सचे व्यवस्थापक नितीन भांगे यांनी सांगितले. ५ सप्टेंबरपासून पाणीपुरवठ्यात बिघाड झाल्याने टँकर धंदा जोरात सुरू झाला आहे.

शनिवारी संध्याकाळपर्यंत सुपा एमआयडीसीतील खंडीत झालेला पाणीपुरवठा पूर्ववत व सुरळीत होईल. त्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे.

-एन जी राठोड अभियंता पाणीपुरवठा विभाग एमआयडीसी.

Web Title: Water supply in Supa MIDC closed from week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.