आंबिजळगाव येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:22 AM2021-05-20T04:22:14+5:302021-05-20T04:22:14+5:30
कर्जत : कुकडीचे आवर्तन सुटले नाही. पाणीपुरवठा योजना असलेली विहीर कोरडी पडली. त्यामुळे कर्जत तालुक्यातील आंबिजळगाव येथील नागरिकांची ...
कर्जत : कुकडीचे आवर्तन सुटले नाही. पाणीपुरवठा योजना असलेली विहीर कोरडी पडली. त्यामुळे कर्जत तालुक्यातील आंबिजळगाव येथील नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबविण्यासाठी येथील सरपंच विलास निकत यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. गावची लोकसंख्या तीन हजारांच्या आसपास आहे. आंबिजळगाव कुकडीपट्ट्यात आहे. मात्र गेल्या वर्षभरात या भागात कुकडीचे पाणी आले नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठीचा तलाव कोरडा पडला आहे. प्रत्येक वर्षी या तलावात कुकडीचे पाणी सोडण्यात येते. मात्र यावर्षी कुकडीला पाणी सुटले नाही. त्यामुळे आंबिजळगाव येथे टँकर सुरू करावा, यासाठी ग्रामपंचायतीने तहसीलदार नानासाहेब आगळेे व गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र प्रशासनाने यावर अद्याप काहीही निर्णय घेतला नाही. त्यामुळे सरपंच विलास निकत यांनी टँकर सुरू केला. यावेळी श्रीराम गायकवाड, राजेंद्र शिंदे, डॉ. विलास त्रिवेदी, माजी सरपंच बाळासाहेब लोंढे आदी उपस्थित होते.
---
आंबिजळगाव येथे पाणी टँकर सुरू करण्यात आला. यावेळी सरपंच विलास निकत व इतर.