पाऊस जिरवला तरच मिळणार पाणी; महाराष्ट्राच्या पोटात १४ अब्ज क्युबिक मीटर पाणी
By अविनाश साबापुरे | Published: April 7, 2024 05:51 AM2024-04-07T05:51:55+5:302024-04-07T05:52:22+5:30
महाराष्ट्राच्या पोटात १४ अब्ज क्युबिक मीटर पाणी
अविनाश साबापुरे
यवतमाळ : उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असतानाच राज्याच्या भूगर्भात अजूनही १४ अब्ज क्युबिक मीटर जलसाठा उपलब्ध असल्याचा अहवाल केंद्रीय भूजल मंडळाने दिला आहे. मात्र, गेल्या वर्षी ज्यांनी पाऊस साठविला, त्याच प्रदेशांना या पाण्याचा लाभ होऊ शकणार आहे. इतरांची टँकरवारी यंदाही कायम राहणार आहे.
केंद्रीय भूजल मंडळाने महाराष्ट्रातील भूजलसाठ्याची आकडेवारी वार्षिक अहवालात जाहीर केली आहे. २०२३ मध्ये महाराष्ट्रात पडलेला पाऊस, त्यातून जमिनीत जिरलेला पाऊस, त्यातून वर्षभरात झालेला पाण्याचा उपसा आणि आता भविष्यकाळासाठी वापरण्यायोग्य उरलेला जलसाठा अहवालात नमूद केला आहे.
गेल्या वर्षीचा पाऊस अन् भूजल साठ्याची सद्य:स्थिती
जल पुनर्भरण झाले :
३२ अब्ज क्युबिक मीटर
पाण्याचा उपसा :
१६ अब्ज क्युबिक मीटर
जमिनीत शिल्लक पाणी :
१४ अब्ज क्युबिक मीटर
पाण्याची वाफ झाली :
०२ अब्ज क्युबिक मीटर
या जिल्ह्यांना भासणार टँकरची गरज
७० टक्क्यांपेक्षा अधिक भूजलाचा उपसा करणाऱ्या जिल्ह्यांना केंद्रीय भूजल मंडळाने ‘ओव्हर एक्स्प्लाॅइटेड’च्या वर्गवारीत नमूद केले आहे. येथे अत्यल्प भूजल शिल्लक असल्याने या जिल्ह्यांना उन्हाळ्यात टँकरद्वारेच नागरिकांची तहान भागवावी लागणार आहे. यात अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती टक्के साठा?
जिल्हा उपसा झाला शिल्लक साठा
अमरावती ९१.८३ ८.१७
अहमदनगर ७९.२० २०.८०
जळगाव ७८.७६ २१.२४
सोलापूर ७७.५४ २२.४६
बुलढाणा ७६.९५ २३.०५
छ.संभाजीनगर ७१.६४ २८.३६
पुणे ६९.६५ ३०.३५
अकोला ६५.५९ ३४.४१
सातारा ६२.११ ३७.८९
धाराशिव ६२.०१ ३७.९९
वाशिम ६०.२० ३९.८०.
बिड ५९.२२ ४०.७८
नाशिक ५८.४१ ४१.५९
लातूर ५४.८८ ४५.१२
जालना ५४.८५ ४५.१५
सांगली ५४.१९ ४५.८१
वर्धा ५३.५५ ४६.४५
धुळे ५१.७७ ४८.२३
नागपूर ४८.९४ ५१.०६
परभणी ४६.५० ५३.५०
सिंधुदुर्ग ४३.३३ ५६.६७
कोल्हापूर ४२.४५ ५७.५५
नंदुरबार ३८.०८ ६१.९२
हिंगोली ३६.४१ ६३.५९
यवतमाळ ३३.७५ ६६.२५
नांदेड ३२.३७ ६७.६३
भंडारा ३०.२२ ६९.७८
चंद्रपूर २९.३२ ७०.६८
गोंदिया २६.३१ ७३.६९
गडचिरोली २४.३७ ७५.६३
पालघर २३.८५ ७६.१५
ठाणे १९.०७ ८०.९३
रायगड १७.९४ ८२.०६
रत्नागिरी १७.३० ८२.७०
एकूण ५३.८३ ४६.१७