मुळा धरणाचा विसर्ग बंद होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 04:52 PM2019-09-15T16:52:05+5:302019-09-15T16:52:12+5:30

मुळा धरणाचा नदी पात्रात होणारा विसर्ग  सोमवारी बंद होण्याची शक्यता आहे.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाटबंधारे खात्याने धरण बघण्याची सर्वांना संधी उपलब्ध करून दिली आहे. 

On the way to the end of the Mula Dam | मुळा धरणाचा विसर्ग बंद होण्याच्या मार्गावर

मुळा धरणाचा विसर्ग बंद होण्याच्या मार्गावर

राहुरी :  मुळा धरणाचा नदी पात्रात होणारा विसर्ग  सोमवारी बंद होण्याची शक्यता आहे.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाटबंधारे खात्याने धरण बघण्याची सर्वांना संधी उपलब्ध करून दिली आहे. 
 मुळा धरणात सध्या २५ हजार ७००  दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची नोंद झाली आहे़ सध्या धरणाच्या ११ मो-यातून २००० क्युसेकने पाण्याचे आवर्तन नदीपात्रात सुरू आहे़ धरणातून जायकवाडीकडे २ हजार ३००  दशलक्ष घनफूट  पाणी वाहून गेले आहे़ धरणाच्या उजव्या कालव्यातून २ हजार २०० क्सुसेकने पाण्याचे आवर्तन सुरू आहे़ याशिवाय डाव्या कालव्यातून १४० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सुरू आहे़
मुळा धरणावर पावसाने विश्रांती घेतल्याने पाण्याची आवक घटली आहे़ २५ हजार ७००  दशलक्ष घनफूट  पाणीसाठा कायम ठेऊन नदी पात्रात पाणी सोडण्याचे धोरण पाटबंधारे खात्याने घेतले आहे़ कोतूळ येथे केवळ २ मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ मुळा नदीपात्रातून दोनदा पाणी सोडल्यामुळे नदी काठी असलेल्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे़ मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्राबरोबरच लाभ क्षेत्रावरही पावसाने विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे धरणाचे दोन्ही कालवे बंद आहेत़ मान्सून परतण्याच्या मार्गावर आहे़ त्यामुळे शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़ लाभ क्षेत्रावर पाऊस घटल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे़ पावसाअभावी मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून ५ हजार दशलक्ष घनफूट  पाणी सोडावे लागले आहे़

Web Title: On the way to the end of the Mula Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.