तृप्ती देसाई नगरच्या वाटेवर, स्मिता अष्टेकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 01:48 PM2020-02-18T13:48:26+5:302020-02-18T13:48:36+5:30

अहमदनगर: इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी अहमदनगरच्या पोलिस अधिक्षकांना भेटणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार देसाई या नगरकडे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

On the way to Tirupati Desai Nagar, Smita Ashtekar was taken into police custody | तृप्ती देसाई नगरच्या वाटेवर, स्मिता अष्टेकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

तृप्ती देसाई नगरच्या वाटेवर, स्मिता अष्टेकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

अहमदनगर: इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी अहमदनगरच्या पोलिस अधिक्षकांना भेटणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार देसाई या नगरकडे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या असेलेल्या नगरच्या स्मिता अष्टेकर यांनी देसाई यांना नगरमध्ये पाऊल ठेवू दिले जाणार नाही, असे खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे नगरची पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
देसाई यांची वाट अडविण्यासाठी निघालेल्या अष्टेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अष्टेकर यांनी दोन दिवसांपूर्वी एका व्हीडिओद्वारे तृप्ती देसाई या नगरमध्ये कशा येतात? हिंगणघाटची घटना घडली, त्यावेळी देसाई कुठे होत्या?  वारकरी संप्रदायाचा अपमान करण्याचा त्यांना काय अधिकार?  असे आव्हान एका व्हीडिओद्लारे दिले होते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. इंदोरीकर यांनी गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत नगरमध्ये ठाण मांडणार असल्याचे देसाई यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर नियोजितपणे देसाई या नगरमध्ये येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही पोलीस अधिक्षक कार्यालयात चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: On the way to Tirupati Desai Nagar, Smita Ashtekar was taken into police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.