कोरोनात पॉझिटिव्ह झालो... जगण्यासाठीही पॉझिटिव्ह राहिलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 11:47 AM2020-05-21T11:47:21+5:302020-05-21T11:47:29+5:30
अहमदनगर : कुठलीही लक्षणे नव्हती़ पण, परिसरात रुग्ण सापडल्याने कुटुंबासह तपासणीसाठी गेलो. आई- वडिलांचे अहवाल निगेटिव्ह आले़ माझा एकट्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर एकदम घाबरून गेलो़ परंतु बुथ हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आणि भीती गायब झाली. पॉझिटिव्ह आलो तरी पॉझिटिव्ह विचारांना सोडले नाही. जगण्याची आशा भक्कम ठेवत नियम पाळले. म्हणून आज तुमच्यासमोर जीवंत उभा आहे, असे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाने ‘लोकमत’ला सांगितले़
अण्णा नवथर ।

नाव न सांगण्याच्या अटीवर आधी कोरोनाबाधित असलेल्या व नंतर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाशी ‘लोकमत’ने दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यावेळी तो म्हणाला, कोरोना हा आजार काय आहे, हे टीव्हीवरून पाहिले होते़ तो आजार विदेशात होता़ आपल्याकडे येईल, असे कधीही वाटले नाही़
पण, अचानक गल्लीतील एकाला त्रास सुरू झाला़ एकानंतर दुसरा, तिसरा
असे रुग्ण वाढत गेले़ आरोग्य सेविकांनी घरी येऊन तपासणी केली़
सर्दीची अॅलर्जी पाचवीला पूजलेली आहे. या सर्दीमुळेच
मीही आई-वडिलांसह तपासणीसाठी गेलो. वैद्यकीय अधिकाºयांनी स्त्रावाचे नमुने घेतले़ मनात भीती होती़ तिघांचे अहवाल आले़ दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले़ एक पॉझिटिव्ह होता़ तो माझाच असल्याने सुरवातीला धक्का बसला. त्यामुळे डॉक्टरांनी बुथ हॉस्पिटलमध्ये दाखल केले़ कमालीची भीती वाटत होती़ काय होणार? आपण बरे होऊ का? दवाखान्यात उपचार मिळतील का? यासह अनेक प्रश्न मनात गुंता करीत होते़ परंतु, दवाखान्यात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले़ तब्बल २० दिवस दवाखान्यात उपचार घेतले़ कोणतीच लक्षणे नाहीत, असे डॉक्टर सांगत होते़ पण,तरीही भीती होतीच़ दवाखान्यात योग्य पध्दतीने उपचार झाले़ डॉक्टर जे सांगत होते, ते सर्व नियम पाळले. मनात जगण्याची पक्की आशा ठेवून एक- एक दिवस स्वत:मध्ये डोकावत होतो. विसाव्या दिवशी रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले़ घरी आल्यानंतरही १४ दिवस क्वारंटाईन आहे़ बाहेर फिरत नाही़ आता घरात बसण्याची सवय झाली आहे़
कुटुंबातील व्यक्तींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो़ कुठलाही त्रास नाही़ पौष्टिक भोजन, व्यायाम करतो. कोरोना कसा झाला़ हे समजले नाही़ पण, त्यातून बरा झालो़ आता नेहमीप्रमाणे काम सुरू केले आहे, असे हा रुग्ण सांगत होता़
----------
नगरच्या आरोग्य यंत्रणेसाठी शब्द नाहीत़़़़
कोरोना आजार महाभयंकर असला तरी आपली आरोग्य यंत्रणा त्याच्याशी लढण्यासाठी सक्षम आहे़ फक्त ते जे सांगतील ते एका़ कोरोना आजारावर नगरमध्ये चांगले उपचार दिले जात आहेत. त्यामुळेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे़ नगरच्या आरोग्य यंत्रणेसाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असे रुग्णाने सांगितले़