आम्हाला नेमकं काय चुकतंय याचा विचार करावा लागेल- बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 03:53 PM2020-02-29T15:53:55+5:302020-02-29T15:54:12+5:30
संगमनेर (जि. अहमदनगर): पाथर्डी तालुक्यातील शेतकºयाने केलेली आत्महत्या दुर्देवी आहे. लोकशाही आघाडी सरकार शेतकºयांना ताकद देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करीत आहे. शेतकरी कर्जमाफी योजना शेतकºयांना कोणताही त्रास होवू देता राबविली, ती सुुरू झाली आहे. शेतकºयांना दिलासा देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे,असे असतानाही शेतकºयांनी का आत्महत्या केली? आम्हाला नेमकं काय चुकतंय याचा विचार करावा लागेल, असे मत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
संगमनेर (जि. अहमदनगर): पाथर्डी तालुक्यातील शेतकºयाने केलेली आत्महत्या दुर्देवी आहे. लोकशाही आघाडी सरकार शेतकºयांना ताकद देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करीत आहे. शेतकरी कर्जमाफी योजना शेतकºयांना कोणताही त्रास होवू देता राबविली, ती सुुरू झाली आहे. शेतकºयांना दिलासा देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे,असे असतानाही शेतकºयांनी का आत्महत्या केली? आम्हाला नेमकं काय चुकतंय याचा विचार करावा लागेल, असे मत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. मंत्री थोरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित केलेल्या काव्यवाचन कार्यक्रमात तिसरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने शेतकरी आत्महत्येवर कविता सादर केल्यानंतर दोन दिवसांनी काल रात्री या मुलाच्या वडिलांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. शेतकरी सरकारने मदत दिल्याशिवाय उभा राहू शकत नाही. तरीही शेतकºयांनी आपले मनोबल पक्के ठेऊन आणि समस्याना सामोरे जावे. कुटुंब आपल्या पाठीमागे आहे. हा विचार केला पाहिजे तर सरकार सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभे आहे. कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणीस सरकारने त्याचे विधेयकात रूपांतर करून कायदा करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. न्यायालयात टिकेल असे आरक्षण मुस्लिम समाजाला देणार आहे. ओबीसी व मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता हे आरक्षण देणार आहे. असेही थोरात म्हणाले.