भाषेच्या अस्तित्वासाठी आपण जागरूक असायला हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:19 AM2021-02-14T04:19:31+5:302021-02-14T04:19:31+5:30
जवाहरलाल नेहरू उर्दू सेंटरच्यावतीने तालुक्यातील समनापूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत मिर्झा गालिब यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत उर्दू भाषा ...
जवाहरलाल नेहरू उर्दू सेंटरच्यावतीने तालुक्यातील समनापूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत मिर्झा गालिब यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत उर्दू भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रा. बाबा खरात, अब्दुल्ला चौधरी, जवाहरलाल नेहरू ऊर्दू सेंटरचे अध्यक्ष इद्रिस शेख, उपाध्यक्ष आसिफ सय्यद, रशीद अब्दुल, मुख्याध्यापक मेहमूद अहमद, मतीन मनियार, आफरिन बाजी, आमेना बाजी, परविन बाजी आदी उपस्थित होते. मिर्झा गालिब ही शायरीतील संपत्ती असे सांगत खुराणा यांनी शेरोशायरीने उपस्थितांची मने जिंकली. खुराणा यांचे फारसी, पंजाबी, इंग्रजी, उर्दू, थाई, हिंदी आणि पश्तो या सात भाषांवर प्रभूत्व आहे. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत ६० वर्ष संगीत निवेदन म्हणून काम केले. त्यांचा जन्म १ जानेवारी १९२७ ला थायलंडमध्ये झाला. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पाकिस्तान झाले. उर्दू भाषेच्या पदवीचे शिक्षण त्यांनी दिल्लीत पूर्ण केले. चित्रपटसृष्टीत आशा भोसले, ओ.पी. नय्यर, आर.डी. बर्मन, सलिल चौधरी आणि अंतरा चौधरी यांच्यासोबतही त्यांनी काम केले आहे. तसेच वर्षा भोसले, कविता कृष्णमूर्ती, मोहंमद रफी, मन्ना डे, तलत महमूद, हेमंत कुमार, किशोर कुमार, महेंद्र कपूर, मीना मंगेशकर यांच्याशी कामाच्या संदर्भाने त्यांची अनेकदा भेट झाली.