आम्ही निघालो गुरं ढोरं घेऊन सोय-याच्या गावाला : राष्ट्रवादीचे चोंडीत दुपारी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:56 AM2018-12-07T11:56:37+5:302018-12-07T11:57:02+5:30
जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी पाथर्डीच्या दुष्काळ दौ-यात दुष्काळी मदत मागणा-या शेतक-यांना अजब सल्ला दिल्यान आज दुपारी ४ वाजता चोंडीत राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात येणार आहे.
हळगांव : जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी पाथर्डीच्या दुष्काळ दौ-यात दुष्काळी मदत मागणा-या शेतक-यांना अजब सल्ला दिल्यान आज दुपारी ४ वाजता चोंडीत राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक किशोर मासाळ यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या वतीने पालकमंत्री राम शिंदे यांच्या चोंडी येथील बंगल्यासमोर जनावरे बांधून निषेध केला जाणार आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यानुसारच आम्ही हे आंदोलन करणार आहोत. पालकमंत्री माझे सोयरे आहेत. सोय-याने केलेल्या आवाहनानुसारच बारामतीहून चोंडीत येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चोंडीत जनावरे घेऊन जाणार असल्याचे राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक किशोर मासाळ यांनी सांगितले.