आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:19 AM2021-02-14T04:19:40+5:302021-02-14T04:19:40+5:30
कोपरगाव तालुक्यातील पोहेगावात पंचवीस वर्षापूर्वी शिवसेना नेते नितीन औताडे हे सरपंच असताना दारूबंदीचा ठराव करण्यात आला होता. त्यावर गावातील ...
कोपरगाव तालुक्यातील पोहेगावात पंचवीस वर्षापूर्वी शिवसेना नेते नितीन औताडे हे सरपंच असताना दारूबंदीचा ठराव करण्यात आला होता. त्यावर गावातील ग्रामस्थांनी नुकतीच विशेष ग्रामसभा घेत पंचवीस वर्षांपूर्वी केलेला ठराव पुन्हा समंत केला आहे.
यावेळी शिवसेना नेते नितीन औताडे, कोल्हे कारखान्याचे संचालक अशोक औताडे, सरपंच अमोल औताडे, उपसरपंच प्रशांत रोहमारे, प्रकाश रोहमारे, सचिन शिंदे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दादासाहेब औताडे, स्थैर्यनिधी चे संचालक रमेश झांबरे, चंद्रकांत औताडे, तात्यासाहेब झांबरे, राजेंद्र औताडे, निखील औताडे, निवृत्ती औताडे, अशोक नवले, सचिन शिंदे, प्रकाश औताडे, प्रकाश रोहमारे, विनायक मुजगुले, कैलास औताडे, रविंद्र भालेराव, नितीन नवले, बाळासाहेब रोहमारे, अजित औताडे, निकिता चौधरी, पुष्पा काकडे, सुनंदा औताडे, रुपाली वाघ, वर्षा निकम, सुनंदा साळुंके, मनिषा ब्राम्हणे, वैशाली सोनवणे, अनिता गांगुर्डे आदींसह महिला ग्रामस्थ व व्यापारी वर्ग उपस्थित होते. प्रास्ताविक ग्रामसेवक रामदास काळे यांनी केले.
औताडे म्हणाले, लोकशाही मार्गाने सार्वजनिक रित्या दारूबंदी विरोधात उठाव करावा लागेल. सतत लढा द्यावा लागेल. कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत, असेल तर त्याला सर्वस्वी पोलीस जबाबदार राहतील. अवैद्य दारु विक्री विरोधात प्रशासनाला जागे करण्यासाठी कोणतेही आंदोलन करण्यासाठी पोहेगाव ग्रामस्थ सज्ज आहेत. ग्रामसभेने दाखवून दिले आहे. अवैध दारूविक्री लवकरात लवकर बंद होण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.