आम्ही करील त्याच्याविरुद्ध करायचे, ही महादेव जानकर यांची भूमिका - अण्णा डांगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 10:26 AM2020-05-31T10:26:34+5:302020-05-31T10:26:44+5:30

चौंडी (जि. अहमदनगर) :  माजी मंत्री महादेव जानकर यांची आणि आमची कितीही दोस्ती असली तरी आम्ही जे करू त्याच्याविरुद्ध करायचे अशीच त्यांची भूमिका असते. अहिल्यादेवींचे वंशज राम शिंदे यांनी ३१ मे रोजी चौंडीत जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र जानकर यांनी मुंबईत जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मस्थळ आहे. म्हणून राम शिंदे यांनी जयंती उत्सव चौंडीतच साजरा करण्याचा निर्णय घेतला, असे माजी मंत्री अण्णा डांगे यांनी आज सकाळी चौंडीत सांगितले. 

We will do it against him, this is the role of Mahadev Jankar - Anna Dange | आम्ही करील त्याच्याविरुद्ध करायचे, ही महादेव जानकर यांची भूमिका - अण्णा डांगे

आम्ही करील त्याच्याविरुद्ध करायचे, ही महादेव जानकर यांची भूमिका - अण्णा डांगे

चौंडी (जि. अहमदनगर) :  माजी मंत्री महादेव जानकर यांची आणि आमची कितीही दोस्ती असली तरी आम्ही जे करू त्याच्याविरुद्ध करायचे अशीच त्यांची भूमिका असते. अहिल्यादेवींचे वंशज राम शिंदे यांनी ३१ मे रोजी चौंडीत जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र जानकर यांनी मुंबईत जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मस्थळ आहे. म्हणून राम शिंदे यांनी जयंती उत्सव चौंडीतच साजरा करण्याचा निर्णय घेतला, असे माजी मंत्री अण्णा डांगे यांनी आज सकाळी चौंडीत सांगितले. 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केल्यानंतर अण्णा डांगे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रावर इतिहासाने कायम अन्याय केला आहे. १९९४-९५ सालापर्यंत अहिल्यादेवींची जयंती साजरी होत नव्हती. कोणाला माहितीही नव्हती. अहिल्यादेवी यांची पुण्यतिथी साजरी व्हायची. आमचे एक धनगर समाजेच संघटन आहे. धनगर समाज महासंघ आणि यशवंत सेना असे दोन संघटन धनगर समाजात आहेत. बापू केंकरे गेल्यानंतर महादेव जानकर हे एका गटाचे प्रमुख झाले. त्यांची आमची दोस्ती आहे. मात्र आमच्याविरुद्ध करायचे, अशी त्यांची भूमिका असते. त्यानंतर ३१ मे रोजी जयंती साजरी करण्याचा निर्णय जानकर यांनी घेतला. त्यानुसार जयंती उत्सव सुरू झाला. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले. राम शिंदे व महादेव जानकर दोघेही मंत्री झाले. आता कोणाच्या नेतृत्त्वाखाली जयंती उत्सव साजरा करायचा, हा प्रश्न होता. महादेव जानकर यांनी मुंबई येथुन जयंती साजरी करण्याची घोषणा केली. चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मगाव आहे. येथेच जयंती साजरी करायची, असा निर्णय राम शिंदे यांनी घेतला.
लॉकडाऊन असल्याने यंदा जयंती साजरी करायची नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी बंद झाली. यंदा हेलिकॉप्टरने पादुका जाणार आहेत. असे असकताना आम्ही कशी जयंती साजरी करणार. आम्ही साजरी केली असती तर तंटा-बखोडा निर्माण झाला असता.त्यामुळे सार्वजनिक स्वरुपात जयंती साजरी न करण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे डांगे म्हणाले.
 
Web Title: We will do it against him, this is the role of Mahadev Jankar - Anna Dange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.