पत्रकार भवनासाठी निधी देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:18 AM2021-01-18T04:18:54+5:302021-01-18T04:18:54+5:30
कानडे म्हणाले, राज्यातील मोठ्या दैनिकांमध्ये मी स्तंभलेखनाचे काम केले. त्यात विचारांशी कोणतीही तडजोड स्वीकारली नाही. श्रीरामपूरची पत्रकारिता राज्यात आदर्शवत ...
कानडे म्हणाले, राज्यातील मोठ्या दैनिकांमध्ये मी स्तंभलेखनाचे काम केले. त्यात विचारांशी कोणतीही तडजोड स्वीकारली नाही. श्रीरामपूरची पत्रकारिता राज्यात आदर्शवत आहे. आपले विचार स्पष्टपणे मांडण्यास सक्षम आहे. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी शहराच्या जडणघडणीमध्ये पत्रकारांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. त्याचीच दखल घेऊन दिवंगत नेते जयंत ससाणे यांनी येथे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांसाठी नगरपालिकेत कायमस्वरुपी निधीची तरतूद करून ठेवली. या पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने राज्यातील नामांकित वक्त्यांना येथे आणले.
जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी नेत्यांच्या विरोधात प्रकाशित बातमीचे वाईट वाटून न घेता ती सकारात्मकरित्या घेण्याचे आवाहन केले. पत्रकार हा सामाजिक व राजकीय जीवनातील महत्त्वाचे अंग असल्याचे जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे यांनी सांगितले. यावेळी संजय छल्लारे, पद्माकर शिंपी, रमण मुथ्था, अशोक तुपे, समीन बागवान, नीलेश भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महंता यादव, सुनील बोलके, राजेंद्र सोनवणे, दत्तात्रय सानप, बाळासाहेब भांड, राजेंद्र बोरसे, बाळासाहेब आगे, नागेश सावंत, सुनील कुलकर्णी, प्रकाश कुलथे, अनिल पांडे, महेश माळवे, सुनील नवले, अशोक गाडेकर व गौरव साळुंके उपस्थित होते.
---------