निवडणुकीनिमित्त नगरमध्ये ५२१ जणांचे शस्त्र परवाने रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 11:41 AM2019-09-29T11:41:24+5:302019-09-29T11:41:58+5:30

विधानसभा निवडणूक शांतता व निर्भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील ५२१ जणांचे शस्त्र परवाने रद्द केले असून, ११४१ जणांना आपल्याकडील शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत़ 

Weapons permits canceled in city for election | निवडणुकीनिमित्त नगरमध्ये ५२१ जणांचे शस्त्र परवाने रद्द

निवडणुकीनिमित्त नगरमध्ये ५२१ जणांचे शस्त्र परवाने रद्द

अहमदनगर: विधानसभा निवडणूक शांतता व निर्भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील ५२१ जणांचे शस्त्र परवाने रद्द केले असून, ११४१ जणांना आपल्याकडील शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत़ 
मयत झालेले व वयोवृद्ध झालेले ९३, परवाना घेऊनही शस्त्र खरेदी न करणारे ४१८ तर गुन्हा दाखल झालेल्या १० जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत़ 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे शस्त्र परवाने रद्द व जमा करण्याबाबत प्रस्ताव दाखल केले होते़ पोलीस प्रशासनाच्या प्रस्तावावर निर्णय घेत जिल्हाधिकारी यांनी हे आदेश केले आहेत़ परवाने रद्द व जमा केलेल्यांमध्ये राजकीयसह विविध क्षेत्रात काम करणाºया व्यक्तिंचा समावेश आहे़ ज्यांच्याकडे शस्त्र आहेत त्यांच्याकडून निवडणूक काळात त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक निवडणूक काळात प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरुपात शस्त्र जमा केले जातात़ तसेच ज्यांचे वय ६५च्या पुढे आहे त्यांचे व मयत झालेल्या व्यक्तिंचेही परवाने रद्द केले जातात़ 
...यांचे शस्त्र होणार जमा 
नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, नंदकुमार झावरे, यशवंतराव गडाख, विजय औटी, अरुण जाधव, सुनील साळवे, राजेश परजणे, सुमित कोल्हे, अशोक काळे, विजय गडाख, प्रशांत गडाख, ज्ञानदेव पठारे, अशोक सावंत, सबाजी गायकवाड, प्रभाकर कवाद, पांडुरंग अभंग, विश्वासराव गडाख, अरुण तनपुरे, चंद्रशेखर कदम, विठ्ठलराव लंघे, रामदास गोल्हार, सुभाष पाटील, उदयसिंह पाटील, अविनाश आदिक, संजय फंड, अंजुम शेख, संजय छल्लारे, बाळासाहेब गिरमकर, भगवानराव पाचपुते, सिद्धेश्वर देशमुख, राजेंद्र पिपाडा, प्रभाकर बोरावके, बाजीराव खेमनर, अंकुश यादव, प्रताप झिने, लहू कानडे, शिवाजीराव अनभुले, बाबासाहेब सानप, नितीन काकडे, अविनाश मोरे, वैभव जगताप, उबेद शेख, शिवाजी कराळे, नितीन जगताप, उमेश गिल्डा, राजेंद्र चोपडा, राजेश एकाडे, रफिउद्दीन शेख, सतीश लांडगे, ब्रिजलाल सारडा, चंद्रकांत गाडे, अमोल जाधव आदींचा समावेश आहे़ 

Web Title: Weapons permits canceled in city for election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.