वीकेंडला शुकशुकाट... ओपनिंग डेला गर्दीच गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:19 AM2021-04-13T04:19:40+5:302021-04-13T04:19:40+5:30
सोमवारी सकाळपासूनच शहरातील चितळे रोड परिसरात नागरिकांनी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी केली होती. तसेच सायंकाळी पाईपलाईन रोडवरील यशोदानगर व तपोवन ...
सोमवारी सकाळपासूनच शहरातील चितळे रोड परिसरात नागरिकांनी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी केली होती. तसेच सायंकाळी पाईपलाईन रोडवरील यशोदानगर व तपोवन रोड परिसरातही भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. भाजीपाला विक्रेते हे अंतर ठेवून बसलेले नव्हते. एकाच विक्रेत्याकडे अनेक ग्राहक गर्दी करून खरेदी करत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. भाजीपाला, किराणा दुकाने, हॉस्पिटल, मेडिकल व इतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार दुकाने व आस्थापना बंद आहेत. घराबाहेर पडणारे बहुतांशी नागरिक मात्र नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
..............
पोलिसांनी प्रत्येकवेळी काठीच उगारावी का?
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नियमांचे पालन करा, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. पोलिसांकडूनही कारवाई सुरू आहे. खरेदीसाठी घराबाहेर पडलेले नागरिक मात्र नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. पोलिसांनी काठी उगारल्यानंतर नागरिक नियम पाळतात. आता मात्र स्वयंस्फूर्तीने प्रत्येकाने नियम पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.