साई परिक्रमेतील भाविकांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:21 AM2021-03-23T04:21:32+5:302021-03-23T04:21:32+5:30

शिर्डी : साई निर्माण उद्योग समूहाच्या वतीने साई परिक्रमातील भाविकांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी साई परिक्रमा ...

Welcome to the devotees of Sai Parikrama | साई परिक्रमेतील भाविकांचे स्वागत

साई परिक्रमेतील भाविकांचे स्वागत

शिर्डी : साई निर्माण उद्योग समूहाच्या वतीने साई परिक्रमातील भाविकांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी साई परिक्रमा अत्यंत साध्या पध्दतीने पूर्ण करण्यात आली.

ग्रीन-ए-क्लीन शिर्डी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त यांच्या वतीने शिर्डीत १५ मार्च रोजी साई परिक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यावर्षी गर्दी टाळत परिक्रमा साध्या पध्दतीने नियमांचे पालन आयोजित करण्यात आली होती. खंडोबा मंदिरात नारळ फोडून परिक्रमा सकाळी ६ वाजता काढण्यात आली होती. परिक्रमा साडेनऊ दरम्यान पूर्ण करण्यात आली. परिक्रमा मार्गात कमलाकर कोते, राहुल गोंदकर, मदन गोंदकर, योगेश काटकर, सचिन चौगुले यांच्या वतीने ठिकठिकाणी चहा, दूध, नाश्ता, पाणी याची सोय करण्यात आली होती. परिक्रमा मार्गातील नागरिकांनी रांगोळी काढून स्वागत केले. साई निर्माण उद्योग समूहाच्या वतीने अध्यक्ष विजयराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत करण्यात आले. साई निर्माण करिअर ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सरबत व पाण्याची व्यवस्था केली होती.

....

साई परिक्रमामुळे आत्मिक समाधान व शांती मिळते. दरवर्षी यात नागरिकांनी सहभागी होणे गरजेचे आहे. साईबाबांच्या कृपेने कोरोनाचे संकट कायमस्वरुपी जावे, पुढील वर्षी परिक्रमेचे भव्य आयोजन करु.

-विजयराव कोते, अध्यक्ष, साई निर्माण उद्योग समूह, शिर्डी.

...

२२साई परिक्रमा

..

ओळी-साई निर्माण उद्योग समूहाच्या वतीने साई परिक्रमातील भाविकांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

Web Title: Welcome to the devotees of Sai Parikrama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.