मुलगी पाहायला निघालात... तर सावधान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 10:49 AM2018-06-05T10:49:03+5:302018-06-05T10:49:11+5:30
पुणे येथील आल्हाट कुटुंबाला तालुक्यातील नान्नज परिसरात मुलगी पहायला बोलावून तीन ते चार जणांनी दमबाजी करीत मोबाईलसह अंगावरील ३४ हजार रूपयांचे दागिने लुटून नेले.
जामखेड : पुणे येथील आल्हाट कुटुंबाला तालुक्यातील नान्नज परिसरात मुलगी पहायला बोलावून तीन ते चार जणांनी दमबाजी करीत मोबाईलसह अंगावरील ३४ हजार रूपयांचे दागिने लुटून नेले.
याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरूद्ध जामखेड पोलीस ठाण्यात फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल नामदेव आल्हाट (वय २५ रा.आंबेडकर नगर, १६ मार्केट यार्ड, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांना सात ते आठ दिवसांपूर्वी मोबाईलवर मी जामखेडमधून मोरे बोलत आहे. तुम्हाला मुलगी बघितली आहे. मुलगी पाहण्यासाठी नान्नज येथे या,असे एका व्यक्तीने सांगितले.
१ जूनला सकाळी विशाल आल्हाट, त्याची आई, बहीण, आजी, चुलती, शेजारी असे भाड्याने रिक्षा घेऊन पुण्याहून जामखेडला निघाले. त्यावेळी फोनवर बोलणारी व्यक्ती नान्नज रोडवरच उभी होती. त्यानंतर या रिक्षासह या कुटूंबाला घेऊन ती व्यक्ती नान्नजपासून दोन किलोमीटर की.मी अंतरावरील एका कच्चा रस्त्यावरुन घेऊन जात असताना या कुटूंबाला पुढे कसलेच घर दिसेना. त्याच दरम्यान शेतात लपलेल्या दोन ते तीन जणांनी त्यांना अडवून महिलांच्या अंगावरील दागिने व मोबाईल असा एकूण ३४ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला.