सरकारच्या चाकात हवा भरण्याचे ठिकाण नेमके कोणते?  भाजपचे खासदार सुजय विखे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 06:41 PM2020-08-22T18:41:54+5:302020-08-22T18:43:13+5:30

जनमताच्या विरोधात जावून बनलेल्या महाविकास आघाडी सरकारला तीन चाके आहेत. यातील चाकांची हवा कमी झाल्यानंतर ते भरण्याचे ठिकाण नेमकं मुंबई, बारामतीला की संगमनेरला आहे? हा  खरा प्रश्न आहे, अशी टीका खासदार सुजय विखे राज्य सरकारवर केली.

What exactly is the place to inflate the wheel of government? Question from BJP MP Sujay Vikhe | सरकारच्या चाकात हवा भरण्याचे ठिकाण नेमके कोणते?  भाजपचे खासदार सुजय विखे यांचा सवाल

सरकारच्या चाकात हवा भरण्याचे ठिकाण नेमके कोणते?  भाजपचे खासदार सुजय विखे यांचा सवाल

शिर्डी : जनमताच्या विरोधात जावून बनलेल्या महाविकास आघाडी सरकारला तीन चाके आहेत. यातील चाकांची हवा कमी झाल्यानंतर ते भरण्याचे ठिकाण नेमकं मुंबई, बारामतीला की संगमनेरला आहे? हा  खरा प्रश्न आहे, अशी टीका खासदार सुजय विखे राज्य सरकारवर केली.

खासदार विखे यांच्या हस्ते कोरोना चाचणी संकलन केंद्राचे शिर्डीत उद्घाटन झाले. यानंतर नगरपंचायतीमध्ये पदाधिकाºयांसमवेत झालेल्या बैठकीनंतर विखे यांंनी माध्यमांशी संवाद साधला. 

आम्ही सरकार पाडू इच्छित नाही. सरकार आपोआप पडणार आहे. महाविकास आघाडीच सरकार त्यांनी चांगल चालवावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र ते चालवत नाहीत. फक्त भाजपवर आरोप केला जातो, अशी  टीका खासदार विखे यांनी केली़

 शिर्डीचे साईबाबा मंदिर लवकरात लवकर सुरु करावे, यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून आपण  देणार असल्याची माहिती  भाजपचे  खासदार विखे यांनी दिली. 

 राज्यातील तीर्थक्षत्र असलेल्या मंदिरामध्ये विश्वस्त मंडळ आहेत. आॅनलाईन पासेसच्या माध्यमातून दर्शनाचे  नियोजन करु शकतात. अशा मंदिरांना राज्य सरकारने परवानगी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

Web Title: What exactly is the place to inflate the wheel of government? Question from BJP MP Sujay Vikhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.