पांढ-या हत्तीने निर्यातीसाठी काय केले ? : राधाकृष्ण विखे यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:40 PM2018-06-10T13:40:47+5:302018-06-10T13:41:04+5:30
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने केवळ संशोधन करीत बसण्यापेक्षा युवकांना निर्यातीसाठी काय करता येईल याचा विचार केला नाही़ विद्यापीठ म्हणजे पांढरा हत्ती हा आरोपच सत्य असून संशोधन केले म्हणजे काम संपले असे नसून कृषी विद्यापीठांनी निर्यातीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
राहुरी : येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाने केवळ संशोधन करीत बसण्यापेक्षा युवकांना निर्यातीसाठी काय करता येईल याचा विचार केला नाही़ विद्यापीठ म्हणजे पांढरा हत्ती हा आरोपच सत्य असून संशोधन केले म्हणजे काम संपले असे नसून कृषी विद्यापीठांनी निर्यातीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
राहुरी येथील एका कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी रात्री हजेरी लावली़ तब्बल दोन तास उशीर हजेरी लावलेल्या विखे यांनी कृषी विद्यापीठाची फिरकी घेतली़ युवक आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करीत जगभर आपले स्थान निर्माण करीत आहेत़ परदेशात गेलो असताना तेथे नगर जिल्ह्यातील युवक भेटले़ खेड्यातील मुले गावाची रेषा ओलांडून परदेशात जाऊन स्थिर स्थावर होतात़ मात्र कृषि विद्यापीठ चार भिंतीच्या बाहेर पडण्यास का तयार नाही? असा सवाल विखे यांनी केला़
आपण कृ षी मंत्री असताना विद्यापीठाने संशोधनाबरोबर शेतकºयांना फायदेशीर ठरतील अशा योजना राबविल्या़ त्या कालावधीत विद्यापीठ केवळ संशोधन दाखवित होते़ मी म्हणालो, त्यापलिकडे निर्यातीसंदर्भात शेतकºयांना दिशा द्या. मात्र विद्यापीठांनी त्यादृष्टीने प्रयत्न केले नाही़ आताचे शासन किती चांगल्या अन् किती चुकीचे धोरण राबवित आहे, असे म्हणत आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे कटाक्ष टाकला़ आमदार कर्डिले यांनी मौन पाळीत त्याला प्रत्युत्तर देण्याचे टाळले़
....
विखे-कर्डिले युती अबाधित?
राज्यात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असताना राहुरीत मात्र राधाकृष्ण विखे व आमदार शिवाजी कर्डिले यांची युती अबाधित असल्याचे चित्र आढळून आले़ पक्ष विसरून विखे-कर्डिले यांची राजकीय जोडगोळी एकाच विचारपीठावर येण्याची संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे़ तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी विखे यांंना आमदार कर्डिले यांनी मदत केली़ आमदारकीच्या निवडणुकीत विखेंच्या कार्यकर्त्यांनी कर्डिले यांना बळ दिले होते़ आगामी काळात खासदारकी व आमदारकीसाठी विरोधक एकत्र येत असताना जिल्ह्याच्या राजकारणात विखे यांची विरोधी पक्षनेते म्हणून काय भूमिका असेल याबाबत उत्सुकता आहे़