महाविकास आघाडीने विकासाचे कोणते दिवे लावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:19 AM2021-01-22T04:19:07+5:302021-01-22T04:19:07+5:30
केडगाव : महाविकास आघाडी ही जनतेच्या भल्यासाठी व विकासासाठी नाही तर फक्त निवडणुकीसाठी व माझ्यावर टीका करण्यासाठी तयार झाली ...
केडगाव : महाविकास आघाडी ही जनतेच्या भल्यासाठी व विकासासाठी नाही तर फक्त निवडणुकीसाठी व माझ्यावर टीका करण्यासाठी तयार झाली आहे. राज्यामध्ये जेव्हा जेव्हा शिवसेनेची सत्ता होती तेव्हा तेव्हा नगर तालुक्यामध्ये किती विकासकामे केली ते आधी दाखवा. पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या काळात यांनी विकासासाठी काय दिवे लावले ते आधी सांगावे, असे आव्हान माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले.
नगर तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत संदस्यांच्या सत्काराप्रंसगी बुऱ्हाणनगर येथे ते बाेलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती
अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, युवा नेते अक्षय कर्डिले, खरेदी विक्रीचे संघाचे अध्यक्ष सुरेश सुंबे, रेवन चोभे, मनोज कोकाटे, दिलीप भालसिंग,
अंबादास बेरड, बाबासाहेब खर्से, नाना भामरे, जालिंदर कदम, दीपक कार्ले, वसंत सोनवणे, संभाजी पवार, बन्सी कराळे, रावसाहेब वाघसकर, गणेश
आवारे, कचरू घोरपडे, प्रकाश पालवे, बाळासाहेब दरेकर, शिवाजी कार्ले, रभाजी सूळ, सुनील पवार, विकास कोथिंबिरे, अशोक आव्हाड, बाजीराव
हजारे, सुभाष निमसे, विष्णू खादवे, दादा दरेकर, बबन हराळ, संतोष भापकर, धनराज सप्रे, गणेश साठे, नाथा शेट आदी उपस्थित होते.