खड्ड्यांमुळे उलटला गव्हाचा ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:50 AM2021-01-13T04:50:46+5:302021-01-13T04:50:46+5:30
मालवाहू ट्रकमधून (एम. एच. १२, सी. टी. ०१८८) संगमनेर तालुक्यातील साकूर येथून सातारा येथे गव्हाची पोती नेली जात होती. ...
मालवाहू ट्रकमधून (एम. एच. १२, सी. टी. ०१८८) संगमनेर तालुक्यातील साकूर येथून सातारा येथे गव्हाची पोती नेली जात होती. साकूरफाटा येथील उपरस्त्याहून नाशिक-पुणे महामार्गाकडे हा ट्रक चालक घेऊन जात असताना त्याला खड्ड्यांचा अंदाज न आल्याने हा ट्रक पलटून उताराला लागला. पुन्हा उपरस्त्याला लागून असलेल्या शेतात जाऊन पलटला. या अपघाताची माहिती मिळताच कर्जुले पठारचे सरपंच रवींद्र भोर, कामगार पोलीस पाटील शिवप्रसाद दिवेकर यांनी ग्रामस्थांसह मदतीकरिता घटनास्थळी धाव घेत ट्रकमधून चालकाला सुखरूप बाहेर काढले.
.....
ग्रामस्थांचा उपोषण, आंदोलनाचा इशारा
नाशिक-पुणे महामार्गावर परिसरातील गावांना जोडण्यासाठी उपरस्ते आहेत. या उपरस्त्यांचे काम अपूर्ण असून त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवर आजवर अनेक अपघात घडले आहेत. मात्र, याकडे महामार्ग प्रशासन गांभीर्याने पहायला तयार नाही. कर्जुले पठारचे सरपंच रवींद्र भोर व ग्रामस्थांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही महामार्ग प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. खराब झालेल्या सर्वच उपरस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू न झाल्यास ग्रामस्थांनी उपोषण, आंदोलनाचा इशारा दिला आहे.
----------
फोटो नेम : १०संगमनेर अपघात
...
ओळ : नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील साकूर फाटा येथे उलटलेला अपघातग्रस्त ट्रक.