उपरस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे गव्हाचा ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 11:49 AM2021-01-10T11:49:26+5:302021-01-10T11:50:15+5:30
नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील साकुर फाटा येथील उपरस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे ट्रक चालकाला अंदाज न आल्याने गहू घेऊन जाणारा ट्रक रस्त्यालगतच्या शेतात पलटी झाला. ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली. यात ट्रक चालक सुदैवाने बचावला. ट्रक व गव्हाचे मोठे नुकसान झाले.
घारगाव : नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील साकुर फाटा येथील उपरस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे ट्रक चालकाला अंदाज न आल्याने गहू घेऊन जाणारा ट्रक रस्त्यालगतच्या शेतात पलटी झाला. ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली. यात ट्रक चालक सुदैवाने बचावला. ट्रक व गव्हाचे मोठे नुकसान झाले.
मालवाहू ट्रक (क्रमांक एम.एच.-१२, सी.टी.०१८८) गव्हाच्या गोण्या घेऊन साकुर येथून सातारा या ठिकाणी जात होता. शनिवारी रात्री ट्रक नऊ वाजेच्या दरम्यान साकुर फाटा येथे आला असता नाशिक-पुणे महामार्गालगतच्या उपरस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे ट्रक चालकाला अंदाज न आल्याने ट्रक लगतच्या चाळीस फूट खोल शेतात उलटला. सुदैवाने चालक बचावला. मात्र, गव्हाच्या गोण्या फुटल्याने गव्हाचे नुकसान झाले.