शेतकऱ्यांचे पैसे बुडविणाऱ्यांना तुरुंगवास कधी?

By Admin | Published: April 27, 2016 11:50 PM2016-04-27T23:50:22+5:302016-04-27T23:55:35+5:30

लोणी : एफआरपीची रक्कम न देणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना सहकार विभाग तुरुगांचा धाक दाखवितो़ पण ज्या खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले,

When did the prisoners of the farmers pay the money? | शेतकऱ्यांचे पैसे बुडविणाऱ्यांना तुरुंगवास कधी?

शेतकऱ्यांचे पैसे बुडविणाऱ्यांना तुरुंगवास कधी?

लोणी : एफआरपीची रक्कम न देणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना सहकार विभाग तुरुगांचा धाक दाखवितो़ पण ज्या खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले, त्यांना तुरुंगात का धाडत नाही? असा संतप्त सवाल काँगे्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केला़
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त ते बोलत होते. विखे कारखान्याच्या कार्यस्थळावरील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात हा कार्यक्रम झाला़ अध्यक्षस्थानी माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. प्रारंभी पद्मश्री विखे यांच्या स्मृतिस्थळावर मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. याप्रसंगी विखे बोलत होते. राज्यातील शेतकऱ्याला सहकारानेच तारले आहे़ पण या सहकाराबाबत सुरक्षित आणि संघटीत आवाज नसल्याची खंत व्यक्त करताना विखे म्हणाले, सहकारातील माणसेच खासगीचे मालक झाले. खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले़ सहकार विभाग त्यांच्यावर कारवाई करीत नाही़ पण एफआरपीची रक्कम न देणाऱ्या सहकारी साखर कारखाने चालविणाऱ्यांना तुरुंगाचा धाक दाखवित आहे, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे यांनी शेतकरी आणि वारकरी हा एकत्रित विचार समाजापर्यंत पोहचविला, या विचारातूनच समृद्धीचा संस्कारीत मार्ग आपल्याला मिळाला, असे उद्धव महाराज मंडलीक यांनी सांगितले़
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख, सभापती बाबासाहेब दिघे, राजेश परजणे, आबासाहेब खर्डे, एम. एम. पुलाटे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अशोक विखे, ट्रक्स वाहतूक सह संस्थेचे अध्यक्ष नंदू राठी, प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, उपाध्यक्ष अशोक आसावा, धनश्रीताई विखे, प्रवरा फळे भाजीपाला उत्पादक संस्थेच्या अध्यक्षा गीता थेटे आदी उपस्थित होते़प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने डॉ.सुजय विखे यांनी उद्धव महाराज मंडलीक यांचा सत्कार केला. प्रास्ताविक जि. प. सदस्य डॉ. भास्कर खर्डे यांनी केले. (प्रतिनिधी)
शेतकरी आत्महत्येला सावकारकी कारणीभूत
पश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी युवकांनी आता लोकाभिमुख चळवळ उभी करुन सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे़ सहकारामुळेच शेतकऱ्यांना आत्मविश्वास मिळाला. पद्मश्री विखे यांनी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला़ यामुळेच त्यावेळी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. पण सावकारशाहीने डोके वर काढले आणि शेतकऱ्यांमधील आत्मविश्वास कमी झाला व आत्महत्या होऊ लागल्या़ सरकारने आज उद्योगाचे पाणी बंद केले असले तरी, शेतीला शाश्वत पाणी कुठे आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Web Title: When did the prisoners of the farmers pay the money?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.