Video : जेव्हा रोहित पवार भर कार्यक्रमातून पंतप्रधानांना फोन लावतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 03:49 PM2020-01-17T15:49:50+5:302020-01-17T16:25:12+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये तरुण, तरुणींसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
संगमनेर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावरून राज्यात खळबळ उडाली होती. खुद्द मोदींनीही बारामतीतील कार्यक्रमात पवारांचे बोट धरून राजकारणात आल्याचे म्हटले होते. याच पवारांच्या नातवाने व्यासपीठावरून थेट पंतप्रधान मोदींना फोन लावला आणि 'मोदी साहेब नमस्ते, मी रोहित पवार बोलतोय...नाव आपण ऐकलं असेल', असे विचारताच सभागृहात उपस्थितांनी एकच आरोळी ठोकली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये तरुण, तरुणींसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे आणदार रोहित पवार आणि शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. या दोघांची गायक अवधूत गुप्ते यांनी मुलाखत घेतली.
यावेळी रोहित पवार यांनी थेट मोदींना फोन लावला. नाव आपण ऐकले असेल, असे म्हणत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आली आहे. यामुळे गेली पाचवर्षे जो विकास झाला नव्हता तो होईलच. पण आमच्या या युवक आणि युवतींना उद्या चांगली नोकरी मिळण्यासाठी जे केंद्राचे इंडस्ट्रीयल धोरण आहे. जे गेल्या काही वर्षांमध्ये अडचणीचे झाले आहे. ते थोडेस बदलावे लागेल. ते बदलाल अशी इच्छा व्यक्त करतो. यामुळे युवक, युवतींना नोकऱ्या मिळतील, अशी विनंती केली.
वानखेडेवर चक्क बारामतीची भेळ? रोहित पवारांचा चेहराच खुलला
तसेच यानंतर शेतकऱ्यांच्या अवस्थेवर बोलताना, शेतकऱ्यांच्या समस्यांवरही लक्ष घालावे. आम्ही खूश आहोत, इथली लोकही खूश आहेत. पण आपण केंद्र सरकारमध्ये काही बदल करावेत. चारच वर्षे राहिली आहेत. तुम्ही व्यस्त असाल, यामुळे तुमचा वेळ घेत नाही. तुम्ही जनतेची काळजी घ्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे सांगितले. यावर सभागृहात उपस्थितांनी जोरदार आवाज देत प्रतिसाद दिला.
..जेव्हा रोहित पवार पंतप्रधान मोदींना फोन लावतात. pic.twitter.com/56R7D9qOiz
— आपला रोहित - AAPLA ROHIT (@RohitPawarSpeak) January 17, 2020
मुलाखतीचा हा भाग होता. यामध्ये रोहित पवार यांनी मोदींशी मराठीत संवाद साधला. प्रत्यक्षात समोर मोदी नव्हते. परंतू रोहित यांनी त्यांच्याशीच बोलत असल्याचे भासवत त्यांच्यातील कलाकार उपस्थितांना दाखविला.