पंधरा हजाराची लाच घेताना नगर जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी रंगेहात पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 03:17 PM2018-01-17T15:17:56+5:302018-01-17T15:18:56+5:30

ग्रामपंचायत विस्तार अधिका-याला पंधरा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

When taking a bribe of 15 thousand, the extension officer of the Zilla Parishad caught him in Tena | पंधरा हजाराची लाच घेताना नगर जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी रंगेहात पकडला

पंधरा हजाराची लाच घेताना नगर जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी रंगेहात पकडला

अहमदनगर : ग्रामपंचायत विस्तार अधिका-याला पंधरा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
पाथर्डीहून संगमनेरला बदली करावी तसेच तक्रारदाराच्या सेवा निलंबन कालावधीबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी विजय निवृत्ती चराटे यांनी तक्रारदाराला लाचेची मागणी केली होती. ही लाच मागताना साहेबांना १० आणि माझे ५ असे एकूण १५ हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. याबाबत संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषद कार्यालयात सापळा लावून पंचासमक्ष चराटे यांना लाच स्विकारताना ताब्यात घेतले. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर कांबळे यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.

Web Title: When taking a bribe of 15 thousand, the extension officer of the Zilla Parishad caught him in Tena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.