अतिक्रमण काढणार कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:20 AM2020-12-31T04:20:57+5:302020-12-31T04:20:57+5:30
मात्र, या रस्त्यावर काही नागरिकांनी थेट रस्त्यालगत अतिक्रमण केले आहे. त्याचा सार्वजनिक रहदारीला अडथळा होत आहे. यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे ...
मात्र, या रस्त्यावर काही नागरिकांनी थेट रस्त्यालगत अतिक्रमण केले आहे. त्याचा सार्वजनिक रहदारीला अडथळा होत आहे. यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना अतिक्रम काढण्यासंदर्भात २८ सप्टेबरला निवेदन दिले होते. त्यानंतर चार महिने उलटले तरीही अतिक्रमण काढले गेले नाही, असा आरोप स्थानिक रहिवाशी दिगंबर कोपरे यांनी केला आहे.
कोपरे म्हणाले, दिलेल्या निवेदनानुसार नगरपरिषदेने संबंधीत अतिक्रमण धारकांना २५ नोव्हेंबरला नोटीस देवून ३० दिवसांच्या आत अतिक्रम काढण्याचे आदेश दिले होते. केलेले अतिक्रम काढले नाही, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते. या नोटीसीला २५ डिसेंबरला एक महिना झाला आहे. तरीही संबंधितानी अतिक्रमण काढलेले नाही. विशेष म्हणजे नगरपरिषदेने देखील यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक रहदारीला अडथला निर्माण करणाऱ्यावर देखील प्रशासन कारवाई करणार नसेल ? तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा ?
.........
“ अतिक्रमण केलेल्या व्यक्तीकडे दोन दिवस लग्नाचा कार्यकम आहे. त्यांनी विनंती केल्याने काहीकाळ कारवाई थांबविली आहे. येत्या ५ जानेवारी २०२१ नंतर अतिक्रमण काढणार आहेत. संबंधितानी अतिक्रमण काढलेच नाही, तर नगरपरिषद प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार आहे.
- प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, नगर परिषद, कोपरगाव