जिकडे तिकडे पाणीच पाणी : टाकीचा वॉल फुटला, अहमदनगर पालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:14 PM2019-05-12T12:14:18+5:302019-05-12T12:14:41+5:30

एकीकडे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल ७७१ टँकर सुरु असून पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे तर

Where no water is there: the wall of the tank broke, and Ahmednagar municipality ignored | जिकडे तिकडे पाणीच पाणी : टाकीचा वॉल फुटला, अहमदनगर पालिकेचे दुर्लक्ष

जिकडे तिकडे पाणीच पाणी : टाकीचा वॉल फुटला, अहमदनगर पालिकेचे दुर्लक्ष

अहमदनगर : एकीकडे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल ७७१ टँकर सुरु असून पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे तर दुसरीकडे अहमदनगर महापालिकेच्या गलथान कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
मुळा धरणातील पाण्याने तळ गाठला असताना शहरातील आगरकर मळा येथील मनपाच्या पाण्याच्या टाकीचा वॉल फुटल्याने सुमारे 10 लाख लिटर पाणी रस्त्यावर सोडण्यात आले आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हे पाणी मोकाट सोडण्यात आले. या घटनेची अद्याप कोणत्याही मनपा अधिका-याने दखल घेतली नाही. परिसरातील नागरिकांनी मात्र पाण्याचा उपयोग करून घेतला. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Where no water is there: the wall of the tank broke, and Ahmednagar municipality ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.