जेथून तिकीट मिळेल तेथे उभा राहील : डॉ. सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:01 PM2018-10-20T12:01:10+5:302018-10-20T12:01:21+5:30

मला उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसचे नेते राहुल गांधी, अशोक चव्हाण, राष्टÑवादीचे नेते शरद पवार हे निर्णय घेतील. मला ते जेथून उमेदवारी देतील, तेथून मी निवडणुकीला उभा राहील.

From where the ticket will be available: Dr. Sujay bique | जेथून तिकीट मिळेल तेथे उभा राहील : डॉ. सुजय विखे

जेथून तिकीट मिळेल तेथे उभा राहील : डॉ. सुजय विखे

राहुरी : मला उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसचे नेते राहुल गांधी, अशोक चव्हाण, राष्टÑवादीचे नेते शरद पवार हे निर्णय घेतील. मला ते जेथून उमेदवारी देतील, तेथून मी निवडणुकीला उभा राहील. राहुरीच्या भरवशावर मी नगर दक्षिण मतदार संघात निवडणूक लढविणार असल्याची घोषणा डॉ़सुजय विखे यांनी केली.
राहुरी येथील डॉ़बा़बा़तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या ५९ वा अग्निप्रदीपन समारंभ शुक्रवारी डॉ़सुजय विखे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पूजन मंदाताई केशवराव कोळसे, सुरेखा रवींद्र म्हसे, लताबाई बाळकृष्ण कोळसे, अलका विजय डौले, लक्ष्मीबाई अर्जुनराव बाचकर या दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आले. 
नगरची जागा राष्ट्रवादी काँगे्रसकडे असून तुम्ही घड्याळ घेऊन खासदारकी लढविणार का? असा प्रश्न विचारला असता विखे म्हणाले, संधी मिळेल तिथून निवडणूक लढविण्याची तयारी आहे़ पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी लोक उत्स्फूर्त जात होते़ मात्र चार वर्षानंतर चार कोटी रूपये खर्च करून शिर्डीसारख्या कार्यक्रमाला माणसे गोळा करावी लागत आहे़ आज कार्यक्रमाला आमदार शिवाजी कर्डिले नसल्याने मी मनसोक्त भाजपवर टीका करीत आहे, असा टोलाही विखे यांनी लगावला़ भाजपच्या लोकप्रियतेला ग्रहण लागल्याची टिकाही त्यांनी केली. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील म्हणाले, गेल्या वर्षी ऊस गाळपासाठी कमी कालावधी मिळाला असताना २ लाख २० हजार टन उसाचे गाळप केले. यंदाच्या गळीत हंगामात जास्तीतजास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट्य असल्याचे पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष शामराव निमसे, संचालक नामदेव ढोकणे, उत्तम आढाव, के. मा. पाटील, शिवाजीराव गाडे, कार्यकारी संचालक टी.आर.ढोणे आदी उपस्थित होते. संचालक सुरसिंग पवार यांनी अभार मानले.

मी पैसे कुठून आणतो हे संचालक मंडळाला माहीत नाही़. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. गेल्यावर्षी कारखान्यासाठी आठ कोटी रूपयांचा भुसा आणला. यंदा पाच कोटी रूपयांचा बॉयलर आणला असून आठ कोटी रूपयांचा भुसा रक्कम वाचणार आहे. मी वैयक्तिकरित्या आठ कोटी रूपये घातले. म्हणून कारखाना चालू झाला. शेतकरी व कामगारांचे देणी देऊ. - डॉ. सुजय विखे.

Web Title: From where the ticket will be available: Dr. Sujay bique

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.