कोण आला रे.. कोण आला.. श्रीगोंदा फॅक्टरीचा कोरोनायोध्दा आला... घोषणाबाजी करीत नागरिकांनी केले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 12:01 PM2020-06-08T12:01:02+5:302020-06-08T12:02:05+5:30
श्रीगोंदा फॅक्टरी येथील १२० किलो वजनाच्या नागरिकाने दहा दिवसात कोरोनाला चितपट केले. रविवारी दुपारी श्रीगोंदा फॅक्टरी परतल्यानंतर नातेवाईकांनी पुष्पवृष्टी केली. कोण आला रे.. कोण आला.. श्रीगोंदा फॅक्टरीचा कोरोनायोध्दा आला ...अशी घोषणाबाजी करुन त्याचे स्वागत केले.
श्रीगोंदा : तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील १२० किलो वजनाच्या नागरिकाने दहा दिवसात कोरोनाला चितपट केले. रविवारी दुपारी श्रीगोंदा फॅक्टरी परतल्यानंतर नातेवाईकांनी पुष्पवृष्टी केली. कोण आला रे.. कोण आला.. श्रीगोंदा फॅक्टरीचा कोरोनायोध्दा आला ...अशी घोषणाबाजी करुन त्याचे स्वागत केले.
या नागरिकाला पुण्यात कोरोनाची बाधा झाली होती. तो श्रीगोंदा फॅक्टरीवर आला आणि तपासणी केली असता कोरोना पॉझिंटीव्ह निघाला. त्यावर या नागरिकाच्या संपर्कात आलेल्या १४ जणांची तपासणी केली असता त्यांच्या भावाचा दहा महिन्याचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. परंतु दोघा काका पुतण्यांनी कोरोनावर विजय मिळविला आहे.
काकाचे श्रीगोंदा फॅक्टरीवर एखादा मल्ल कुस्ती जिंकून येतो तशी रविवारी गावात एन्ट्री झाली. यानंतर नागरिकांनी एकच जल्लोष केला. सोशल डिस्टीटींग आहे याचे भान हरपून नातेवाईकांनी जल्लोष केला.