कुणी कॉट देता का कॉट? : जिल्हा रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:56 AM2018-12-15T10:56:39+5:302018-12-15T10:57:06+5:30
कुणी कॉट देता का कॉट? एका रुग्णाला कुणी कॉट देता का?
अहमदनगर : कुणी कॉट देता का कॉट? एका रुग्णाला कुणी कॉट देता का? एक रुग्ण कॉटवाचून, बेडवाचून, डॉक्टरांच्या मायेवाचून, नर्सच्या दयेवाचून उघड्याबोडख्यावर पडतोय़ जिथून कुणी उठवणार नाही अशी एक कॉट धुंडाळतोय़ कुणी कॉट देता का़़़ कॉट?, अशी आर्त साद घालण्याची वेळ जिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर आलीय़ कधी कधी तर एका बेडवर दोन-दोन रुग्णांना झोपवण्याची किमयाही जिल्हा रुग्णालयात होत असल्याचे ‘लोकमत’च्या स्टींग आॅपरेशनमध्ये उघड झाले़
शुक्रवारी दुपारी अडीच वाजता ‘लोकमत’ची टीम जिल्हा रुग्णालयात पोहोचली़ सोबत एक रुग्ण होता़ या रुग्णावर तातडीने उपचार व्हावेत, अशी विनवणी ही टीम तेथील वॉर्डबॉय, नर्सेस यांना करित होते़ पण कोणीही त्यांना दाद नव्हते़ साधे काय दुखतेय, अशी विचारणाही कोणी केली नाही़ ‘डॉक्टर नाहीत़ तुम्ही चार वाजल्यानंतर या, एव्हढेच सरकारी उत्तर दिले जात होते़ त्यानंतर ‘लोकमत’च्या टीमने जिल्हा रुग्णालयातील वेगवेगळ्या वॉर्डमध्ये पाहणी केली़ काही ठिकाणी रुग्णांना खाली फरशीवर गादी टाकून झोपविण्यात आले होते़ तर काही ठिकाणी एका बेडवर दोन-दोन रुग्णांना झोपविण्यात आले होते़ कुस बदलण्यासाठीही त्यांना मोठे कष्ट घ्यावे लागत होते़ काही रुग्ण अपघातात जखमी झालेले तर काहींना दुर्धर आजाराने ग्रासलेले होते़ पण त्यांना खाली फरशीवर झोपविण्यात आले होते़ या रुग्णांशी ‘लोकमत’ने संवाद साधला़ वारंवार कॉटची मागणी करुनही कॉट उपलब्ध करुन दिली जात नसल्याचे या रुग्णांनी सांगितले़ तर वॉर्डबॉयने कॉट शिल्लक नसल्यामुळे त्यांना खाली झोपविण्यात आल्याचे सांगितले़
तर खासगीत जा
एका रुग्णाला पायाला लागलेले होते़ फरशीवर त्याला झोपविण्यात आले होते़ हा रुग्ण कॉटसाठी विनवणत होता़ परंतु, त्याला सरळ खासगी रूग्णालयातजाण्याचा सल्ला देण्यात आला़ खासगीत जाण्याइतके पैसे असते तर इकडे नरकयातना भोगायला कशाला आलो असतो, असा सवाल त्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला़
१०० ते २०० कॉटची गरज
जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे सध्या उपलब्ध असणाºया कॉटची संख्या अपुरी पडत आहे़ शासनाकडे १०० ते २०० कॉट नव्याने पुरविण्यात याव्यात, असा प्रस्ताव पाठविला आहे़ पण अद्याप त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही़ नव्या कॉट उपलब्ध झाल्यानंतर रुग्णांची गैरसोय टळेल, असे डॉ़ मुरंबीकर यांनी सांगितले़
स्वतंत्र वुमन्स हॉस्पिटलचा प्रस्ताव
जिल्हा रुग्णालयात महिला रुग्णांची संख्या प्रचंड आहे़ महिला व पुरुष वॉर्ड वेगवेगळे असले तरी जागा अपुरी पडत आहे़ उपचार करताना मर्यादा येतात़ त्यामुळे सरकारकडे जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच स्वतंत्र वुमन्स हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव पाठविला आहे़ पूर्वी जुन्या हॉस्पिटलच्या जागेवर हा प्रस्ताव दिला होता़ मात्र, जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच वुमन्स हॉस्पिटल व्हावे, अशी आमची मागणी आहे़ त्यावर पाठपुरावा सुरु आहे़ तसे झाल्यास डॉक्टरांच्या उपलब्धतेनुसार सेवा बजावता येईल, असे डॉ़ मुरंबीकर यांनी सांगितले़
जिल्हा रुग्णालयात सध्या ३०० कॉट आहेत़ नोव्हेंबर महिन्यात ३ हजार १४९ रुग्ण अॅडमिट होते़ वाढत्या रुग्ण संख्येमुळे कॉट अपुºया पडत आहेत़ बाह्य रुग्ण विभागात १७ हजार ७२९ रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत़ ५१५ महिलांच्या प्रसूति तर ६१० रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत़ मागील आठवड्यात ८५० दिव्यांगांना आॅनलाईन प्रमाणपत्र वितरीत केले आहेत़- - डॉ़ प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्य चिकित्सक