टँकर गेले कुण्या गावा ? नियमभंग करणा-या ठेकेदारांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 05:06 PM2019-05-12T17:06:31+5:302019-05-12T17:10:57+5:30

टँकरच्या पाणी पुरवठ्यातील अनियमिततेबाबत ‘लोकमत’ने जिल्ह्यात केलेल्या स्टिंग आॅपरेशनची विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी गंभीर दखल घेतली आहे.

Who has gone to tanker town? Take action on the contractor who violates the rules | टँकर गेले कुण्या गावा ? नियमभंग करणा-या ठेकेदारांवर कारवाई करा

टँकर गेले कुण्या गावा ? नियमभंग करणा-या ठेकेदारांवर कारवाई करा

अहमदनगर : टँकरच्या पाणी पुरवठ्यातील अनियमिततेबाबत ‘लोकमत’ने जिल्ह्यात केलेल्या स्टिंग आॅपरेशनची विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी गंभीर दखल घेतली आहे. जे ठेकेदार पुरवठ्यात अनियमितता करताना आढळले त्यांच्यावर कारवाई करा, असा आदेश त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना दिला आहे.
टँकरचे ठेकेदार वेळेवर जनतेपर्यंत टँकर पोहोचवत नाहीत. अनेक गावांमध्ये पाणी न पोहोचविताच नागरिकांच्या लॉगबुकवर
स्वाक्ष-या घेण्यात आल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला आहे. टँकरचालक ‘लॉगबुक’ जवळ बाळगत नसल्याने बोगस बिले लावून टँकरची बिले काढली जातात, असाही संशय निर्माण झाला आहे.
‘लोकमत’च्या २४ प्रतिनिधींनी एकाच वेळी केलेले हे स्टिंग समोर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. नाशिक महसूल विभागाचे आयुक्त राजाराम माने यांनी या वृत्तांकनाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांशीही संपर्क केला आहे. ज्या टँकरचालकांनी अनियमितता केल्याचे पुरावे सापडतील त्यांचेविरुद्ध कारावाई करा. विविध पथके पाठवून तपासणी करा, असा आदेश त्यांनी दिला आहे.

ठेकेदारांमुळे अधिकारी पुन्हा अडचणीत
४यापूर्वी नगर जिल्ह्यात २००२ मध्ये टँकर घोटाळा झाला होता. त्याप्रकरणात जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची अद्यापही चौकशी सुरु आहे. याहीवर्षी जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अधिकारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. टँकर ठेकेदार प्रशासनावर दबाव आणून खोटी बिले मंजूर करण्याचा प्रयत्न करतात. त्याचे परिणाम मात्र अधिकारी, कर्मचा-यांना भोगावे लागतात. महसूल विभाग टँकरच्या निविदा मंजूर करतो. टँकरची अचानक तपासणी करण्याचे अधिकारही महसूलच्या अधिका-यांना आहे. मात्र, बिलांची जबाबदारी जिल्हा परिषदेवर येते.

प्रशासन जनसुनवाई घेणार का?
गत चार महिन्यात गावात खरोखर टँकर पोहोचले का? लॉगबुकवर ज्या स्वाक्ष-या दाखविण्यात आल्या आहेत त्या ख-या आहेत का? याची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने ग्रामसभा घेऊन जनसुनवाई घेण्याची आवश्यकता आहे. त्यातून टँकरचालकांची बनावटगिरी उघडकीस येऊ शकते. ही सुविधा जनतेपर्यंत नीट पोहोचत आहे का? हेही यातून समजू शकेल.

लोकमत’कडे आहेत ‘स्टिंग’चे पुरावे
‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी गावोगाव केलेल्या टँकरच्या ‘स्टिंग’चे छायाचित्रे व ‘व्हिडिओ’ उपलब्ध आहेत. ‘ लोकमत अहमदनगर’च्या फेसबुक पेजवर हे सर्व ‘व्हिडिओ’ प्रसारित करण्यात आले आहेत. अनियमतेविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रशासनाला हे पुरावे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

Web Title: Who has gone to tanker town? Take action on the contractor who violates the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.