टँकर गेले कुण्या गावा ? : पाणीपुरवठा नसतानाही महिलांच्या घेतल्या सह्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 05:48 PM2019-05-11T17:48:49+5:302019-05-11T17:48:54+5:30

वर्षानुवर्षे तहानलेल्या राहाता तालुक्यातील कोºहाळे या गावात शासकीय पाणी वाटपाचा हिशोब जुळता जुळत नसल्याचे समोर आले आहे़

Who has gone to tanker town? : Women are not allowed to supply water | टँकर गेले कुण्या गावा ? : पाणीपुरवठा नसतानाही महिलांच्या घेतल्या सह्या

टँकर गेले कुण्या गावा ? : पाणीपुरवठा नसतानाही महिलांच्या घेतल्या सह्या

प्रमोद आहेर 
शिर्डी : वर्षानुवर्षे तहानलेल्या राहाता तालुक्यातील कोºहाळे या गावात शासकीय पाणी वाटपाचा हिशोब जुळता जुळत नसल्याचे समोर आले आहे़ टँकर आला नसतानाही टँकरच्या रजिस्टरवर महिलांच्या खोट्या सह्या घेतल्याचा प्रकार येथे आढळून आला.
कोºहाळ्यासाठी एक टँकर रोज चार खेपा करून गावठाण वगळता दहा वाड्यावस्त्यांना पाणी पुरवतो़ कागदोपत्री नियमितता दिसत असली तरी प्रत्यक्षात अनियमितता दिसते़ सोनवणे वस्तीवर मागील आठवड्यात टँकर आल्याचे लता सोनवणे व अलका सोनवणे यांनी सांगितले़ ९ मे रोजी कालेवाडीत पाणी दिल्याची टँकरच्या लॉगबुकमध्ये नोंद आहे़ तेथील अर्चना कालेकर व मंगल विखे या दोन महिलांची नावेही लिहिलेली आहेत़ या महिलांची भेट घेतली असता रिकामे टिप दाखवत महिनाभरापासून टँकर आलाच नसल्याचे त्यांनी सांगितले़ विशेष म्हणजे मंगल विखे या सत्ताधारी गटाच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत़ टँकरने खाजगी खेपा करण्यात येत असल्याचा आरोप नितीन विखे यांनी केला़ तर एकच टँकर तीन-चार वाड्यांवर खाली करून तेवढ्या खेपा दाखवत असल्याची शंका एकनाथ कालेकर यांनी व्यक्त केली़ ८ मे रोजी टँकर बंद असल्याने पाणी वाटप झाले नसल्याचे ग्रामसेवक संजय कहांडळ व वाहन चालक नवनाथ गुंजाळ यांनी सांगितले़ सध्या पाणी कमी पडल्याने खेपा कमी होतात असेही ते म्हणाले़ टँकरवरील लॉगबुकवर गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामसेवकाने सह्याच केलेल्या नाहीत किंवा कोऱ्या पानावर रेषा मारुन नंतर लिहिता येणार नाही असेही काही केलेले नाही हे शंकास्पद आहे़

जीपीएस प्लास्टिकमध्ये
टँकरची जीपीएस सिस्टीम प्लास्टीक कागदात गुंडाळून ठेवण्यात आली आहे़ ती चालू आहे की बंद समजायला मार्ग नाही, चालकाचेही याबाबत अज्ञान आहे़

Web Title: Who has gone to tanker town? : Women are not allowed to supply water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.