भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतय कोण; काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांसमोर झळकविले फलक

By अरुण वाघमोडे | Published: August 25, 2023 02:59 PM2023-08-25T14:59:16+5:302023-08-25T14:59:46+5:30

अधिकारी, लोकप्रतिनिधी, ठेकेदारांनी संगनमतातून शहरातील रस्त्यांचे निकृष्ट दर्जांची कामे करत २०० कोटीहून अधिक रकमेची बिले काढली.

Who is supporting the corrupt; The Congress officials displayed the placards in front of the Commissioner | भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतय कोण; काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांसमोर झळकविले फलक

भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतय कोण; काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांसमोर झळकविले फलक

अहमदनरगर : अधिकारी, लोकप्रतिनिधी, ठेकेदारांनी संगनमतातून शहरातील रस्त्यांचे निकृष्ट दर्जांची कामे करत २०० कोटीहून अधिक रकमेची बिले काढली. हा भ्रष्टाचार दडपण्यासाठी बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट तयार करण्यात आले. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करा, या मागणीसाठी शुक्रवारी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांसमोर भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतय कोण? असे फलक झळकाविले. यावेळी आयुक्त व काळे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

रस्ता कामातील अपहाराबाबत कारवाईच्या मागणीसाठी काळे यांनी १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा ईशारा दिला होता. यावेळी आयुक्तांच्या मान्यतेने उपायुक्त व शहर अभियंत्यांनी दीड महिन्यांच्या आत बनावट टेस्ट रिपोर्टच्या कागदपत्रांची पडताळणी करून कायदेशीर कारवाई करण्याचे व बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलेल्या कामांची सक्षम प्राधिकरणाकडून चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. याबाबत मात्र, आतापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात न आल्याने काँग्रेसने आयुक्तांना विचारणा केली.

यावेळी म्हणाले म्हणाले शहरातील रस्त्यांच्या कामांची जाहीररित्या गुणवत्ता तपासणीसाठी मनपाच्या पथकाला पाचारण करून देखील पथक आले नव्हते. शहराचे आमदार, नगरसेवक, आयुक्त, शहर अभियंता हे देखील या चाचणीला सामोरे जाण्यासाठी बोलावूनही आले नाही. याबाबत काँग्रेसने शासकीय तंत्रनिकेतनकडेही तक्रार केली होती. आता शहराच्या विविध भागांतील काँग्रेस कार्यकर्त्यांची विशेष बैठक घेऊन त्यामध्ये रस्ता घोटाळ्यातील दोषींवर कायदेशीर कारवाईसाठी विशेष मोहीम राबविणार असल्याचे काळे यांनी सांगितले.

यावेळी दशरथ शिंदे, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, सुनील क्षेत्रे, अलतमश जरीवाला, अभिनय गायकवाड, हनीफ जहागीरदार, गौरव घोरपडे, इंजि. सुजित क्षेत्रे, रतिलाल भंडारी, आप्पासाहेब लांडगे, प्रशांत जाधव, किशोर कांबळे, आकाश जाधव, राहुल सावंत, उषा भगत, राणी पंडित, सुनिता भाकरे, मिनाज सय्यद, पुनम वन्नम, जरीना पठाण, आकाश आल्हाट, सोफियान रंगरेज, समीर सय्यद, आनंद जवंजाळ, राकेश वाघमारे, शंकर आव्हाड आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Who is supporting the corrupt; The Congress officials displayed the placards in front of the Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.