कोण आठवले? मी ओळखत नाही - प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 03:45 AM2018-02-03T03:45:08+5:302018-02-03T03:45:33+5:30
मला राखीव मतदारसंघाची गरज नाही. कोण रामदास आठवले? मी ओळखत नाही. आपण बाळ ठाकरे आहोत. अजून खेळ सुरू व्हायचा आहे. मीच सबसे बडा खिलाडी आहे, असा दावा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
कोपरगाव - मला राखीव मतदारसंघाची गरज नाही. कोण रामदास आठवले? मी ओळखत नाही. आपण बाळ ठाकरे आहोत. अजून खेळ सुरू व्हायचा आहे. मीच सबसे बडा खिलाडी आहे, असा दावा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ आहे़ प्रत्यक्षात शेतकºयांच्या पदरी काहीही पडलेले नाही. त्यामुळे लोकांचा भाजप सरकारवरील विश्वास उडाला आहे. भाजप सरकारने गॅस सबसिडीच्या ४० हजार कोटी रुपयांचे काय केले? याचा हिशेब अजून नाही. अर्थसंकल्पात शेतकºयांना दीडपट भाव वाढवून दिला. पण शेतीमूल्यात ती रक्कम प्रतिवर्धित झालेली नाही तर पुन्हा महागाईचा भडका उडेल. मागच्या वेळी ८५ हजार कोटी क्रुड तेलाचे वाचले होते. गॅस सबसिडी सोडल्याने ४० हजार कोटींचा फायदा झाला होता. तेव्हा अर्थव्यवस्था जेमतेम चालली.
मंदीची लाट असल्याने सरकारचे उत्पन्न घटले
८ लाख कोटींनी बँका तोट्यात आहेत. त्यांचे पैसे भरून देण्याचे सरकारचे धोरण आहे. एका बाजूला बँकांमधून पैसा काढायचा, तर दुसºया बाजूला माफ करायचा. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. देशभरात खरेदी करणारी यंत्रणा उभी करण्यासाठीचे अनुदान या अर्थसंकल्पात दिसत नाही, अशी टीका आंबेडकर यांनी केली.
यावर्षी मंदीची लाट असल्याने सरकारचे उत्पन्न घटले. मात्र खर्च तसाच राहिला. मागील वर्षीची तफावत यंदा ३२ टक्क्यांनी वाढली. त्यामुळे सरकारला बाजारातून पैसे उभे करावे लागतील. पण ते आणायचे कोठून?