कोण होणार श्रीगोंदा बाजार समितीचा सभापती? उपसभापतींंविरुध्दही अविश्वास ठराव दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:36 PM2020-07-15T12:36:11+5:302020-07-15T12:36:57+5:30
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात राजकारण पेटले आहे. उपसभापती वैभव पाचपुते यांच्याविरोधात १२ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. नवीन सभापती, उपसभापती निवडीवर छुप्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
श्रीगोंदा : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात राजकारण पेटले आहे. उपसभापती वैभव पाचपुते यांच्याविरोधात १२ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. नवीन सभापती, उपसभापती निवडीवर छुप्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पाचपुते यांच्या विरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर धनसिंग भोयटे, बाळासाहेब नाहाटा, संजय जामदार, संजय महांडूळे, मीना आढाव, भास्कर वागस्कर, विठ्ठल पाचपुते, शैला काटे, उर्मिला गिरमकर, राघू धायगुडे, सतीश पोखर्णा, उमेश पोटे यांच्या सह्या आहेत.
गेल्या आठवड्यात बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता उपसभापतींवर अविश्वास ठराव झाला आहे. त्यामुळे सभापती उपसभापती नवीन येणार हे निश्चित आहे
बाजार समितीत सत्ता परिवर्तनाचा सारीपाठ मांडलेल्या काही संचालकांनी नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांची भेट घेतली होती. दरम्यान आता नवीन सभापती निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.