कोरोनाच्या लढाईत मेंम्बर तुम्ही कुणासोबत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:50 PM2020-05-24T12:50:23+5:302020-05-24T12:51:04+5:30
भाजपाच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाला महाविकास आघाडीच्या ठिकठिकाणच्या नगरसेवकांनी आम्ही महाविकास आघाडीसोबत, अशा पोस्ट व्हायरल केल्या. नगरमध्ये मात्र भाजपाच्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी उत्तर दिले गेले नाही. त्यामुळे कोरोनाच्या या लढाईत मेंम्बर तुम्ही कुणासोबत? असा सवाल कार्यकर्ते आता महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना विचारत आहेत.
अहमदनगर : भाजपाच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाला महाविकास आघाडीच्या ठिकठिकाणच्या नगरसेवकांनी आम्ही महाविकास आघाडीसोबत, अशा पोस्ट व्हायरल केल्या. नगरमध्ये मात्र भाजपाच्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी उत्तर दिले गेले नाही. त्यामुळे कोरोनाच्या या लढाईत मेंम्बर तुम्ही कुणासोबत? असा सवाल कार्यकर्ते आता महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना विचारत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपययोजना केल्या जात आहेत. केंद्रात भाजपाचे तर राज्यात सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष सत्तेत आहेत. केंद्राकडून मिळालेला निधी जनतेपर्यंत पोहोचला नसल्याचा भाजपाचा आरोप आहे. भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन करत सरकारावर जहरी टीका केली. महाविकास आघाडी सरकारावर सर्वाधिक नगर जिल्ह्यातून झाली आहे. त्यामुळे एक नव्हे तर तिन्ही पक्षांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचली. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी तर सराकारचे अस्त्विावरच प्रश्न निर्माण केला. परंतु, त्याला जिल्ह्यातून एकाही महाविकास आघाडीच्या नेत्याने उत्तर दिले नाही. पण, आम्ही कुणासोबत आहेत? हे ही उघडपणे सांगण्याचेही धाडस केले नाही. नेत्यांनीच असे मौन पाळल्याने महाविकास आघाडी नगरसेवकांनी आंदोलनावर बोलणे टाळले. इतर शहरांत मात्र आम्ही आघाडीसोबत, आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत, यासह अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या गेल्या. पण नगर शहरासह जिल्ह्यातील नगरसेवकांनी कोरोनाच्या लढाईत आम्ही कुणासोबत? हे ठापपणे सांगणे टाळले आहे. भाजप जिल्ह्यात अक्रमक होत असताना महाविकास आघाडीतील ही मरगळ लपून राहिलेली नाही. त्याची चर्चाही आता उघडपणे कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे.
सरकारची भूमिका मांडणार कोण?
राज्य सरकारकडून कारोनाचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार मतदारसंघात गरजूंना आपल्या परीने मदत करीत आहेत. प्रशासनाशी चर्चा करून आमदार येणा-या अडचणी सोडविताना दिसतात. पण, पण महाविकास आघाडी एकजुटीने सरकारची भूमिका मांडताना दिसत नाही. तिन्हीपैकी पक्षातून एकही नेता पुढे आला नाही. त्यामुळे सरकारची भूमिक जिल्ह्यात कोणी मांडणार आहे की नाही? असा सवाल तळागाळातील कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.