‘अगस्ती’वर ३५० कोटींचे कर्ज का झाले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:20 AM2021-03-28T04:20:19+5:302021-03-28T04:20:19+5:30
अकोले : तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तयार झालेली समन्वय समिती सर्व स्तरांवर कार्यरत आहे. अगस्ती साखर कारखाना प्रशासनाने वार्षिक सभेच्या ...
अकोले : तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तयार झालेली समन्वय समिती सर्व स्तरांवर कार्यरत आहे. अगस्ती साखर कारखाना प्रशासनाने वार्षिक सभेच्या निमित्ताने सभासदांच्या प्रश्नांची लेखी स्वरुपात उत्तरे द्यावीत. कारखान्यावर ३५० कोटींचा कर्जबोजा का झाला? ३० वर्षांत आदिवासी भागात ऊसक्षेत्र का वाढले नाही? असा सवाल आ.र डाॅ. किरण लहामटे यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
अगस्तीच्या कार्यक्षेत्रात आजही एक लाख मेट्रीक टन ऊस तोडणीचा बाकी आहे. १७ महिन्यांचा ऊस झाला असून तुरे वाढल्याने वजन घटणार आहे. वेळेत ऊस तोडला गेला नाहीतर वेळप्रसंगी शेतकऱ्यांना घेवून आंदोलन छेडू, असा इशारा आ.डाॅ.लहामटे यांनी यावेळी दिला. अगस्ती साखर कारखान्याचे सेवानिवृत्त मुख्य लेखापाल दिवंगत मारुती गोपाळा भांगरे यांच्या हस्तलिखिताची अगस्ती साखर कारखान्याच्या भ्रट कारभाराचा जाहीर पंचनामा' अशी पुुुुस्तिका समन्वय समितीने तयार केेेली आहे. हेच सभासदांचे प्रश्न समजून प्रशासनाने सभासदांना उत्तरे द्यावीत, असे लेखी निवेदन शुक्रवारी कार्यकारी संचालक यांना देण्यात आले आहे, असेही लहामटे यांनी सांगितले.
यावेळी साथी दशरथ सावंत, डाॅ.अजित नवले, बी. जे. देशमुख, दादापाटील वाकचौरे, विनय सावंत, सोन्याबापू वाकचौरे, दिलीप शेणकर, संपत कानवडे उपस्थित होते.
....
सन्मवय समितीचे आरोप
कार्यक्षेत्रात ऊस नसताना जास्त क्षमतेचा कारखाना उभारला. २७ वर्षांत ११ वेळा अपेक्षित ऊस गाळप झाले नाही. मालमत्ता वाढवून दाखवून शेतकरी सभासदांच्या बोकांडी कर्जाचा डोंगर उभा केला. २८ कोटी ३० लाख कर्ज काढून गाळप क्षमता वाढविण्यासाठी खर्च व क्षमतेपेक्षा मोठा इथेनॉल प्रकल्प हे आत्मघातकी निर्णय कारखाना प्रशासनाने घेतले, असे आरोप समन्वय समितीने केले आहेत.
...