कर नाही त्याला डर कशाची ? : खा. सुजय विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:53 PM2021-03-27T16:53:52+5:302021-03-27T16:54:12+5:30
आमचा कोणताही स्वार्थ नाही. कर नाही त्याला डर कशाची, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी केले
लोणी : अनेकांनी खासगी कारखाने काढले. आपण मात्र आव्हानात्मक परिस्थितीवर मात करुन सहकाराची चळवळ निस्वार्थपणे पुढे घेवून जात आहोत. यामध्ये आमचा कोणताही स्वार्थ नाही. कर नाही त्याला डर कशाची, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी केले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खासदार डॉ. सुजय विखे बोलत होते.
डॉ. सुजय विखे म्हणाले, केंद्र सरकारने सहकारी साखर कारखानदारीबाबत चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सहकारी साखर काखानदारीला चांगले दिवस येणार आहेत. अनेक जण सहकार चळवळ संपवायला निघाले होते. अनेकांनी स्वत:चे कारखाने काढले. आम्ही मात्र ही चिळवळ निस्वार्थपणे पुढे नेत आहोत.
जेष्ठनेते आण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा बँकेचे चेअरमन बाळासाहेब भवर, चेअरमन नंदू राठी, डॉ. भास्करराव खर्डे, विश्वासराव कडू, कैलास तांबे, रामभाऊ भूसाळ, आण्णासाहेब कडू, कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे यांच्यासह सर्व संचालक याप्रसंगी उपस्थित होते. कारखान्याचे सभासद ऑनलाईन पध्दतीने या सभेत सहभागी झाले होते. विविध विषयांचे ठराव या सभेत सर्वानुमते मंजुर करण्यात आले.