... तर विखेंनी कारवाई का केली नाही

By Admin | Published: August 16, 2015 11:53 PM2015-08-16T23:53:54+5:302015-08-17T00:01:31+5:30

राहुरी : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार केला असा बिनबुडाचा आरोप करणाऱ्या विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे सरकार असताना चौकशी का केली नाही

... why not take action against them | ... तर विखेंनी कारवाई का केली नाही

... तर विखेंनी कारवाई का केली नाही

राहुरी : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार केला असा बिनबुडाचा आरोप करणाऱ्या विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे सरकार असताना चौकशी का केली नाही, असा टोला मारत आमदार शिवाजी कर्डिले यांनी नगर कारखाना व दूध संघ बंद पाडला असून राहुरीत खोडा घालण्याचा एकमेव कार्यक्रम राबविला जात असल्याचा आरोप माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केला़
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे अध्यक्षस्थानी होते. तनपुरे म्हणाले की, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती डबघाईस आली असा आरोप करणाऱ्या विरोधी पक्ष नेते राधाकृ ष्ण विखे यांची राहाता बाजार समिती ओलांडून कांदा आमच्याकडे कसा येतो.तीन मंत्र्यांचे स्टिंग आॅपरेशन करू अशी गर्जना करणारे विखे अजून गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला़
विखे-कर्डिले यांचे अतिक्रमण जनतेला मान्य नसून संगमनेर, अकोले, नेवासा, शेवगाव याप्रमाणे राहुरी बाजार समितीतही सत्ताधारी जनसेवा मंडळाला कौल मिळेल असा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला़ माजी केंद्रीय कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरले असतांना विखे गप्प का असा सवाल प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केला़ स्थानिक राजकारणामध्ये स्वारस्य दाखविण्यापेक्षा विखे यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे, असे तनपुरे म्हणाले.
यावेळी दत्तात्रय अडसुरे, विठ्ठल मोकाटे, संजय पोटे, सभापती अरूण तनपुरे उपस्थित होते. प्रास्तविक सुरेश बाफना यांनी केले़ जिल्हा शिवसेना प्रमुख रावसाहेब खेवरे, दत्तात्रय अडसुरे, विठ्ठल मोकाटे, संजय पोटे, प्रकाश देठे, संजय पवार यांची भाषणे झाली़ कार्यक्रमास प्रसाद शुगरचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे, पे्ररणा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे, दत्ता खुळे, राहुल शेटे, केरू पानसरे आदी उपस्थित होते़
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: ... why not take action against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.