धोंड्यात ५ तोळे सोन्याच्या चेनसाठी पत्नीवर अत्याचार; मुंबईतील घटना; नगरमध्ये पतीसह दिरावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 02:35 PM2023-08-04T14:35:23+5:302023-08-04T14:35:54+5:30

या महिलेने माहेरी अहमदनगर येथील तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

Wife assaulted for 5 tola gold chain for the Dhonda; Incidents in Mumbai | धोंड्यात ५ तोळे सोन्याच्या चेनसाठी पत्नीवर अत्याचार; मुंबईतील घटना; नगरमध्ये पतीसह दिरावर गुन्हा

धोंड्यात ५ तोळे सोन्याच्या चेनसाठी पत्नीवर अत्याचार; मुंबईतील घटना; नगरमध्ये पतीसह दिरावर गुन्हा

अहमदनगर : धोंड्याला पाच तोळ्यांची सोन्याची चेनच पाहिजे, अशी मागणी करीत पत्नीवर नवरा व दिराने सामूहिक अत्याचार केला. तसेच या अत्याचाराचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. या महिलेने माहेरी अहमदनगर येथील तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

नगरमधील या २१ वर्षीय तरुणीचे मुंबई येथील तरुणाशी मे महिन्यात लग्न झाले होते. मुलीच्या वडिलांनी लग्नात दहा तोळे सोने दिले. लग्नानंतर चार दिवसांनंतरच विवाहितेचा छळ सुरू झाला. फर्निचर बनविण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यास तिने नकार दिल्यामुळे पती व दिराने महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सध्या धोंड्याचा महिना सुरू आहे. धोंड्यात मला पाच तोळ्याची सोन्याची चेन पाहिजे, अशी मागणी पतीने केली. त्यालाही महिलेने नकार दिला. त्यामुळे पतीसह सासू-सासऱ्यांनी विवाहितेला हँगरने मारहाण केली. 

शुक्रवारी पतीने धोंड्याच्या कारणावरून महिलेशी वाद घातला. त्यावेळी पती व दिराने विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करत पती व दीर महिलेला घेऊन बेडरूममध्ये गेले. तेथे दोघांनी महिलेवर बळजबरीने अत्याचार केला. 

घडलेला प्रकार जर कुणाला सांगितला तर अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी दिली, असे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पती व दीर यांच्यासह सासू-सासऱ्यांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Wife assaulted for 5 tola gold chain for the Dhonda; Incidents in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.