अहमदनगरमध्ये पोलीस पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:07 PM2018-04-12T12:07:34+5:302018-04-12T12:13:10+5:30

स्वत:च्या मुलीच्या उपचारासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीला वारंवार त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस विकास नानाभाऊ सातपुते याच्यासह सासू शोभा नानाभाऊ सातपुते, दिर प्रकाश नानाभाऊ सातपुते, प्रियंका प्रकाश सातपुते, मामा सासरे सतीष गायकवाड यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 Wife commits suicide in Ahmednagar | अहमदनगरमध्ये पोलीस पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

अहमदनगरमध्ये पोलीस पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

ठळक मुद्देमाहेरहून एक लाख रुपये आणण्याचा तगादा

अहमदनगर : स्वत:च्या मुलीच्या उपचारासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीला वारंवार त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस विकास नानाभाऊ सातपुते याच्यासह सासू शोभा नानाभाऊ सातपुते, दिर प्रकाश नानाभाऊ सातपुते, प्रियंका प्रकाश सातपुते, मामा सासरे सतीष गायकवाड यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरु आहे. विकास सातपुते हे तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

सासरच्या त्रासाला कंटाळून प्रणाली विकास सातपुते यांनी बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी प्रणाली यांची आई विजयश्री दगडू उजागरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, प्रणाली उजागरे यांचे ४ वर्षापुर्वी पाईपलाइन रोड येथील गावडे मळ््यातील पोलीस असणारे विकास नानाभाऊ सातपुते यांच्याशी लग्न झाले. या दांपत्याला अडीच वर्षाची शौर्या नावाची मुलगी आहे. मुलगी झाल्यानंतर नव-यासह सासरच्या मंडळीनी प्रणालीस त्रास देण्यास सुरुवात केली. ‘तुला मुलगी झाली असून ती एका हाताने अपंग आहे. तुझ्या मुलीच्या औषधोपचार करण्यासाठी आई-वडीलांकडून घेऊन ये’ अशी सातत्याने मागणी करत होते. माहेरच्या लोकांनी पैसे न दिल्यास प्रणाली व मुलगी शौर्या हीस सासरची मंडळी त्रास देत असत. शौर्यांच्या हाताच्या आॅपरेशनसाठी पती विकास सातपुते याने सासरच्या मंडळीकडे १ लाख रुपयांची मागणी केली होती. ‘तुम्ही आजच्या आज पैसे द्या, मला माझे घरचे लोक खूप त्रास देत आहेत, तुम्ही ताबडतोब पैसे घेऊन घरी या’ असे १० एप्रिल २०१८ रोजी प्रणालीने वडील दगडू उजागरे यांना फोनवरुन कळविले. त्यानंतर वडील उजागरे यांनी प्रणालीच्या घरी जाऊन घरच्यांना समजावून सांगितले होते. तसेच आज पैसे देतो असेही यावेळी सांगितले होते. मात्र तत्पुर्वीच प्रणाली हिने छळाला कंटाळून बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करत आहेत.

 

Web Title:  Wife commits suicide in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.