पत्नीचा गळा दाबून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 07:22 PM2017-05-14T19:22:53+5:302017-05-14T19:22:53+5:30

दररोज भांडत असल्याचा राग धरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुलाखाली टाकून देण्यात आला होता.

Wife's blood throttling | पत्नीचा गळा दाबून खून

पत्नीचा गळा दाबून खून

आॅनलाईन लोकमत
श्रीगोंदा (अहमदनगर), दि़ १४ - दररोज भांडत असल्याचा राग धरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुलाखाली टाकून देण्यात आला होता. श्रीगोंदा तालुक्यातील चिखली शिवारात ९ मे रोजी ही घटना घडली.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, कैलास आनंद नरके व पत्नी सविता (रा. नरके वाडी तळेगाव ढमढेरे, ता.शिरूर,जि. पुणे) या दाम्पत्यामध्ये वारंवार भांडणे होत असत. कैलास ट्रकवर चालक होता. यवत (ता. दौंड) येथील एका मसालेच्या कंपनीत नोकरीला होता. ९ मे रोजी अकोला येथील एका व्यापाऱ्याचा मसाला त्याने ट्रकमध्ये भरला आणि तळेगावला पत्नी सविताला मसाला नेण्यासाठी बोलावले. तिला ट्रकमध्ये बसवून शिरूर, कोळगाव मार्गे चिखलीला आणून तिचा गळा दाबून खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी सविताचा मृतदेह पुलाखाली फेकून दिला. या संदर्भात बेलवंडी पोलीस ठाण्यात १२ मे रोजी महिलेचा मृतदेह सापडल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन वागंडे यांनी पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा ३६ तासात तपास लावला. यासाठी पोलीस राहुल मोढळे, आबासाहेब झावरे, कैलास देशमुख यांनी विशेष मदत केली. आरोपी कैलास नरके याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन वांगडे करीत आहेत.
पैंजणीमुळे लागला छडा
सविताच्या पायात चांदीची जोडवी, पैंजण होते. पैंजणवर ‘बीएमएमएन ९११’ असा मार्क होता. अशा मार्कचे दागिने शिरूर, शिक्रापूर परिसरातील सोनार विकतात याची माहिती पोलिसांना मिळाली. शिक्रापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याचे काही गुन्हे दाखलआहेत का याची शहानिशा बेलवंडी पोलिसांनी केली. तेव्हा सविता नरके ९ मे पासून बेपत्ताअसल्याचे समजले. पोेलिसांनी हे पैंजण सविताच्या मुलींना दाखविले असता त्यांनी हंबरडा फोडला. कैलास नरकेकडे पोलिसांनी चौकशी केली असता सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु नंतर त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली.

Web Title: Wife's blood throttling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.