शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:19 AM2021-03-25T04:19:53+5:302021-03-25T04:19:53+5:30

शिक्षकांनी प्रामुख्याने प्रलंबित मेडिकल बिले व इतर रजा बिले वेळेवर मिळावीत. शाळांच्या ऑडिटबाबत सर्व शाळांना सारख्याच ऑडिट मुद्द्यांबाबत कमतरता ...

Will follow up to solve teachers' questions | शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार

शिक्षकांनी प्रामुख्याने प्रलंबित मेडिकल बिले व इतर रजा बिले वेळेवर मिळावीत. शाळांच्या ऑडिटबाबत सर्व शाळांना सारख्याच ऑडिट मुद्द्यांबाबत कमतरता दाखवून खुलासे मागवावा. यासह इन्कम टॅक्सबाबत मुख्याध्यापकांकडे वाढीव रकमेची मागणी, वाढीव शैक्षणिक अर्हता नोंदी सेवापुस्तकात करणेकामी होत असणारा विलंब, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचे प्रश्न आदी प्रश्नांवर शिक्षकांनी चर्चा केली. या सर्व प्रश्नांचा प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यांची सोडवणूक करणार असल्याचे ढेरंगे म्हणाले.

जिल्हा संघाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, जिल्हा गुरुमाउली मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ साळवे, शिक्षक बँकेचे अध्यक्ष राजू राहणे, साहेबराव अनाप, पी.डी.सोनवणे, भाऊराव राहिंज, अशोक गिरी, सोमनाथ गळंगे, अंजली मुळे, गीता बाप्ते, विलास दिघे, सयाजी राहाणे, दिनकर सागर, केशव घुगे, कैलास सहाणे, राजेंद्र सदगीर, दिनकर कोकणे, निवृत्ती भागवत, प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Will follow up to solve teachers' questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.