पारगाव-भातोडीच्या विकासास सहकार्य करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:19 AM2021-01-22T04:19:01+5:302021-01-22T04:19:01+5:30
केडगाव : स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारी ऐतिहासिक भूमी अशी ओळख असणारे पारगाव-भातोडी (ता.नगर) येथील ऐतिहासिक तलावाचे सुशोभीकरण करावे, तसेच शहाजी ...
केडगाव : स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारी ऐतिहासिक भूमी अशी ओळख असणारे पारगाव-भातोडी (ता.नगर) येथील ऐतिहासिक तलावाचे सुशोभीकरण करावे, तसेच शहाजी राजांनी येथे केलेल्या लढाईमध्ये पहिल्यांदा गनिमी काव्याचा वापर झाला. या लढाई नंतरच शहाजीराजे यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला. ‘उत्तरेत शहाजान, तर दक्षिणेत शहाजी’ अशी म्हण पुढे प्रचिलीत झाली.
त्या पारगाव भातोडी भूमीमध्ये शहाजीराजांच्या स्मृतींना उजाळा देणारे स्मारक उभारावे, अशा मागणीचे पत्र खासदार उदयनराजे भोसले यांना देण्यात आले. त्यांनी पारगाव-भातोडीच्या विकासास सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
व्याख्याते गणेश शिंदे यांनी उदयनराजे यांची
पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. छत्रपती शहाजी राजे यांचे स्मारक करत असताना स्मारक म्हणून तरूणांना दिशा देणारे युवा केंद्र उभारण्याचा मानस असल्याचे गणेश शिंदे यांनी यावेळी सांगितले. स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती तसेच विविध खेळांचे मार्गदर्शन असणाऱ्या छत्रपती संभाजीराजे भोसले न्यूज सेंटरचा आराखडा मांडण्यात आला. भातोडी गावी असणारी शरीफजी राजे यांची समाधी उभारण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी ही मागणी या प्रसंगी गणेश शिंदे यांनी केली.