नाट्यचळवळ अखंडित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:04 AM2021-01-08T05:04:17+5:302021-01-08T05:04:17+5:30
कोपरगाव : कोपरगाव तालुक्याला मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. तो मधल्या काळात खंडित झाल्यासारखा वाटत होता. परंतु, संकल्पना ...
कोपरगाव : कोपरगाव तालुक्याला मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. तो मधल्या काळात खंडित झाल्यासारखा वाटत होता. परंतु, संकल्पना फाऊंडेशन आणि लद्दे ड्रामॅटिक्स स्कूल यांनी सुरू केलेल्या प्रशिक्षण शिबिरातून दर्जेदार बालनाट्य, प्रायोगिक नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची निर्मिती होवून सादरीकरणाची परंपरा अखंडितपणे सुरू राहील. त्यातून ही चळवळ टिकवून ठेवण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे मत कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुधीर डागा यांनी व्यक्त केले.
कोपरगाव शहरात नाट्यप्रशिक्षण शिबीर कार्यशाळेला नुकतीच सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी डागा बोलत होते. अध्यक्षस्थानी संकल्पना फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.मयूर तिरमखे होते. नाट्यप्रशिक्षण कार्यशाळा येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरतील, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी स्वाती मुळे आणि विकास किर्लोस्कर यांनी व्यक्त केले. कोपरगावकरांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण दिले जाईल, असे प्रतिपादन कार्यशाळेचे मुख्य प्रशिक्षक प्रा. किरण लद्दे यांनी केले. लद्दे ड्रामॅट्रिक्स स्कूलला प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना संकल्पना फाऊंडेशन यांच्या वतीने विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली जाईल, अशी घोषणा संकल्पना फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. मयूर तिरमखे यांनी केली.
याप्रसंगी लोकमतचे उपसंपादक रोहित टेके, पत्रकार शंकर दुपारगुडे, गजानन पंडित, शिवव्याख्येते किरण ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोहित शिंदे, चेतन गवळी, सागर पवार, कैलास नाईक, श्रीकांत साळुंके, प्रसाद सोनवणे, प्रवीण शेलार, प्रमोद सानप, योगेश सोनवणे, वैभव बिडवे, प्रशांत बोरावके, प्रा. कल्पना निंबाळकर, सुनिता इंगळे, आरती खेमनर, अश्विनी शिंदे, प्रांजल सपकाळ,अदिती जगताप आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक गणेश सपकाळ यांनी तर सूत्रसंचालन आरती सोनवणे यांनी केले.
..............
फोटो०४ कोपरगाव नाट्य शिबीर
...
ओळी-कोपरगाव शहरात नाट्यप्रशिक्षण शिबीर कार्यशाळेत मार्गदर्शन करताना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुधीर डागा.
040121\img_20210102_171203.jpg
कोपरगाव येथील नाट्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना सुधीर डागा समवेत डॉ. मयूर तिरमखे, विकास किर्लोस्कर, स्वाती मुळे.प्रा. किरण लद्दे .