सर्वांना सोबत घेऊन कामे करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:28 AM2021-06-16T04:28:29+5:302021-06-16T04:28:29+5:30

तालुक्यातील उंबरगाव ते अशोकनगर या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार कानडे बोलत होते. या वेळी भैरवनाथ ...

Will work with everyone | सर्वांना सोबत घेऊन कामे करणार

सर्वांना सोबत घेऊन कामे करणार

तालुक्यातील उंबरगाव ते अशोकनगर या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार कानडे बोलत होते. या वेळी भैरवनाथ मंदिरातील विश्वस्त, पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने कानडे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, अरुण नाईक, अंकुश कानडे, डॉ. वंदना मुरकुटे, कार्लस साठे, ॲड. समीर बागवान, विष्णुपंत खंडागळे, विलास शेजुळ, सोमनाथ पाबले, सरपंच किशोर बनकर उपस्थित होते.

कानडे म्हणाले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मी लोकप्रतिनिधी झालो. सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी मी बांधील आहे. शेतकरी लाखोंचा पोशिंदा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे रस्त्यांचे प्रश्‍न सोडवत आहे. कोरोनामुळे शाळा बंद झाल्या. त्यामुळे आमदार निधीतून सर्व जिल्हा परिषद शाळांना एलएफडी दिले आहेत. त्यातून शिक्षणाचा मार्ग खुला होईल. शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेच्या प्रश्‍नांसाठी ४२० केव्हीएचे वीज उपकेंद्र मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे विजेचा प्रश्न सुटेल.

मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याची मी सर्वाधिक खबरदारी घेत आहे. त्यामुळे आपण निश्चिंत असावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी सतीश बोर्डे, सुरेश पवार, राजू औताडे, रमेश आव्हाड, हरिभाऊ बनसोडे, अशोक भोसले, ॲड. मधुकर भोसले, ज्ञानेश्वर भोसले, विराज भोसले, बाबासाहेब कोळसे, गोरक्षनाथ वाबळे, जितेंद्र भोसले, नीलेश बनकर, भरत साळुंके, चिमाजी राऊत, विजय वाबळे आदी उपस्थित होते.

--------

फोटो आहे : कानडे

उंबरगाव ते अशोकनगर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना आमदार लहू कानडे.

-------

Web Title: Will work with everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.