विसापूर परिसरात वादळाने मोठे नुकसान : परिसरातील गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 11:24 AM2018-10-04T11:24:19+5:302018-10-04T11:24:24+5:30

श्रीगोंदे तालुक्यातील विसापूर परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वा-याने शेतीसह महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Wind dams in Visapur area: Majority of villages in the area are in dark | विसापूर परिसरात वादळाने मोठे नुकसान : परिसरातील गावे अंधारात

विसापूर परिसरात वादळाने मोठे नुकसान : परिसरातील गावे अंधारात

विसापूर : श्रीगोंदे तालुक्यातील विसापूर परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वा-याने शेतीसह महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मंगळवारी झालेल्या वादळी वा-यामुळे मोठे नुकसान झाले. ऊसासह अन्य पिके जमीनदोस्त झाली. अनेक झाडे भुईसपाट ढाली. महावितरणच्या विसापूर उपकेंद्राचे हद्दीतील सर्व लाईन पोल पडले. त्यामुळे विसापूरसह निंबवी, कोरेगव्हाण, साराळा सोमवंशी चांभुर्डी, सुरेगाव, उख्खलगाव, घुटेवाडी, मुंगुसगाव व पिंपळगाव पिसाचा काही भाग चोवीस तास अंधारात होता. महावितरणच्या कर्मचा-यांनी बुधवारी दिवसभर प्रयत्न करुन रात्री उशिरा काही भागाचा विजपुरवठा सुरळीत केला. काही गावांमध्ये तर अजिबात पाऊस झाला नाही,मात्र नुकसान झाले.

Web Title: Wind dams in Visapur area: Majority of villages in the area are in dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.