नाहुली, नायगाव, खर्डा भागात वादळी पाऊस
By Admin | Published: May 21, 2014 12:15 AM2014-05-21T00:15:21+5:302024-10-23T13:33:17+5:30
जामखेड : तालुक्यातील नायगाव, नाहुली, लोणी व खर्डा परिसरात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी पाऊस झाला.
जामखेड : तालुक्यातील नायगाव, नाहुली, लोणी व खर्डा परिसरात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी पाऊस झाला. यामध्ये १७ हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले तर २५ घरांवरील पत्रे उडून गेले. नाहुली येथे वीज पडून एक म्हैस मृत्युमुखी पडली. फळबागांचे नुकसान नायगाव, नाहुली परिसरात १७ हेक्टर क्षेत्रातील केळी, चिकू, आंबा, डाळींब या फळबागांचे नुकसान झाले. यामध्ये ८ हेक्टर क्षेत्रातील डाळींब व केळीचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे तलाठी अहवालात म्हटले आहे. नायगाव येथील शेतकरी संजय उगले यांचे दोन हेक्टर क्षेत्रातील केळी बाग या वादळाने पूर्णत: नष्ट झाली आहे. म्हैस दगावली नायगाव येथे १४, नाहुली येथे ९ व लोणी येथे २ घरावरील पत्रे उडून गेली. नाहुली येथील महादेव मारूती बहिर यांच्या म्हशीवर वीज पडून ती दगावली. यामध्ये त्यांचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)