औरंगाबादची जिजामाता भेंडावर मात : ३२ व्या राज्यस्तरीय १९ वर्षाखालील क्रॉम्टन क्रिकेट स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 06:33 PM2017-12-26T18:33:22+5:302017-12-26T18:43:33+5:30
हरमीतसिंग रागीची फटकेबाजी आणि विशाल शेटे याच्या धारदार गोलदांजीच्या बळावर विनर्स औरंगाबाद संघाने भेंड्याच्या जिजामाता ज्युनिअर कॉलेज संघाचा ३१ धावांनी पराभव केला. ६१ चेंडूत ९१ धावा चोपणा-या हरमीतसिंग रागीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : हरमीतसिंग रागीची फटकेबाजी आणि विशाल शेटे याच्या धारदार गोलदांजीच्या बळावर विनर्स औरंगाबाद संघाने भेंड्याच्या जिजामाता ज्युनिअर कॉलेज संघाचा ३१ धावांनी पराभव केला. ६१ चेंडूत ९१ धावा चोपणा-या हरमीतसिंग रागीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
अहमदनगर जिल्हा क्रीकेट असोसिएशन व क्रॉम्टन ग्रीव्हज लिमिटेड, नगर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय १९ वषार्खालील ३२ व्या क्रॉम्प्टन क्रिकेट करंडक स्पर्धेला येथील जिल्हा क्रीडा संकुलातील वाडिया पार्क येथे रविवारपासून सुरुवात झाली आहे. स्पर्धे्तील दुसरा सामना मंगळवारी विनर्स औरंगाबाद विरुध्द जिजामाता ज्युनिअर कॉलेज भेंडा यांच्यात रंगला. विनर्स औरंगाबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलदांजीचा निर्णय घेतला. संघाने निर्धारित ४० षटकांत ६ बाद २४१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सलामीला आलेल्या हरमीतसिंग रागी याने भेंडा संघाची गोलंदाजी फोडून काढली. अवघ्या ६१ चेंडूत ६ षटकार लगावत ९१ धावा चोपल्या. त्याला साथ देत करण लवेरा याने ५९ धावा केल्या. श्रीनिवास कुलकर्णी याने २७ तर विशाल शेटे याने २० धावांचे योगदान दिले. भेंडा संघाच्या सुरज जाधव याने ५ षटकात १४ धावा देत २ तर अंकित मिश्रा याने ५५ धावा देत २ बळी मिळवले.
प्रत्युउत्तरादाखल विजयासाठी २४२ धावांचे लक्ष्य भेंडा संघाला पेलवले नाही. सलामीला आलेल्या सुरज जाधव याने ६४ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या फलंदाजाही विजयासाठी प्रयत्न केले मात्र विजय मिळवून देण्यास त्यांना यश आले नाही. केशव बोरुडे याने ३३ धावा ठोकल्या. अक्षय चांदगुडेने १८ तर उत्सव सिन्हा याने १६ धावांचे योगदान दिले. सर्व संघ ३५ षटकांत २१० धावात गारद झाला. औरंगाबाद संघाकडून विशाल शेटे याने भेदक गोलंदाजी केली. त्याने ५ षटकांत ३१ धावा देत ४ गडी बाद केले. त्याला साथ देत करण लवेरा, सौरभ जाधव व हिमांशु मुकुंद यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. या भेदक गोलंदाजीमुळे औरंगाबाद संघाने ३१ धावांनी विजय मिळविला. विनर्स औरंगाबादकडून ९१ धावा करणा-या हरमितसिंग रागी यास सामनावीर घोषित करण्यात आले. धाव लेखनाचे काम अजय कविटकर यांनी पाहिले.
उद्याचा सामना -
वेंगसकर अॅकेडमी पुणे विरुध्द परभणी जिल्हा क्रिकेट असोसिएशन