नाशिक,लातूर,औरंगाबाद,पुणे संघाकडून विजयी सलामी

By Admin | Published: December 22, 2015 11:05 PM2015-12-22T23:05:27+5:302015-12-22T23:11:41+5:30

शेवगाव : शेवगाव येथील क्रीडांगणावर सुरू असलेल्या १६ वर्षे वयोगटातील मुले-मुलींच्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत मुलांच्या नाशिक व लातूर तर मुलींच्या औरंगाबाद, लातूर व पुणे संघाने विजयी सलामी दिली

The winning salute from Nashik, Latur, Aurangabad, Pune team | नाशिक,लातूर,औरंगाबाद,पुणे संघाकडून विजयी सलामी

नाशिक,लातूर,औरंगाबाद,पुणे संघाकडून विजयी सलामी

शेवगाव : शेवगाव येथील रेसिडेन्सिअल हायस्कूलच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या १६ वर्षे वयोगटातील मुले-मुलींच्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत मुलांच्या नाशिक व लातूर तर मुलींच्या औरंगाबाद, लातूर व पुणे संघाने विजयी सलामी दिली.
मुलांच्या नाशिक व औरंगाबाद विभागीय संघात पार पडलेल्या शुभारंभाच्या सामन्यात नाशिक संघाने औरंगाबादच्या संघावर ५ गुणांनी विजय मिळविला. नाशिक संघातील वनराज जाधव याने २.२० मी. पळती केली. तर विजय गांगार्डे याने ४.२० मी. नाबाद पळती केली. आकाश शिंदे याने ४ गडी बाद केले. औरंगाबाद संघातील कृष्णा ढवळे याने २.२० मी. पळती करून २ गडी बाद केले. लातूर व मुंबईच्या संघात प्रत्येकी १५ समान गुण होऊन बरोबरी झाल्याने जादा डाव घेण्यात आला. त्यात लातूर संघाने १ गुण व २.४० मी. राखून निर्णायक विजय मिळविला. विकास लंजीले याने १.२० मी. तसेच ३ मी. पळती करून ५ गडी टिपले. शिवशंकर गंडेदर याने १.४० मी. व १.२० मी. पळती केली. आकाश भोसले याने २.२० मी. व १.१० मी. पळती करून ७ गडी बाद करून उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
मुलींच्या लातूर व मुंबई संघात रंगलेल्या सामन्यात लातूरच्या संघाने एक डाव व ६ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. ऋतुजा चव्हाणने ६ मी. व ४.२० मी. पळती करून ४ गडी टिपले. अक्षदा कुलकर्णीने ३ गडी बाद करण्यात यश मिळविले. मुंबईच्या संघातील नमीता मुळे हिने १.३० मी. पळती करून २ गडी बाद करण्यात यश मिळविले. औरंगाबाद व नागपूर संघात रंगलेल्या सामन्यात औरंगाबाद संघाने नागपूर संघावर १ डाव व ३ गुणांनी मात केली. मनिषा पवार नाबाद ३.२० मि. पळती, शितल प्रभाले व वर्षा चव्हाण प्रत्येकी २.५० मी. पळती, मुमताज शेख हिने ४ गडी बाद करण्यात यश मिळविले. नागपूर संघातून रेश्मा नखाते १.३० मी. व पूनम लांजेवाल २.४० मी. पळती करून क्रीडा रसिकांचे लक्ष वेधले. पुणे व अमरावती संघातील लक्षणीय सामन्यात यजमान पुणे विभागीय संघाने एक डाव १५ गुणांनी दणदणीत विजय मिळविला.
शेवगावच्या अरुंधती वांढेकर हिने २ मी. पळती करून २ गडी बाद करण्यात यश मिळविले. सायली ढोले व निशिगंधा घाडगे या महिला खेळाडूंनी प्रत्येकी ३.३० मी. पळती करून उपस्थित क्रीडा रसिकांची वाहवा मिळविली. अमरावती संघातील अमृता जाधवने १.३० मी. पळती केली.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The winning salute from Nashik, Latur, Aurangabad, Pune team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.